Nokia चे मालकी हक्क असणारी कंपनी HMD Global ने आपला नवीन हँडसेट Nokia 3.2 लॉन्च केला आहे, जो काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला होता. डिवाइसची किंमत 8,990 रुपयांपासून सुरु होत आहे.
किंमत आणि उपलब्धता
Nokia 3.2 कंपनीने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसच्या 2जीबी रॅम व 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. तर डिवाइसच्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,790 रुपये आहे. डिवाइस 23 मे पासून कंपनीच्या वेबसाइट आणि सर्व रिटेल स्टोर्स वर सेल केला जाईल. तसेच फोन Black आणि Steel कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.
ऑफर्स
लॉन्च ऑफर्स बद्दल बोलायचे तर या डिवाइस सोबत वोडाफोन आणि आइडिया सब्सक्राइबर्सना 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक 50 वाउचर्सच्या रूपात मिळेल, ज्यात एक वाउचरची किंमत 50 रुपये असेल. ग्राहकांना हे रीडीम करण्यासाठी 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावा लागेल. तसेच जर तुम्ही हा एचडीएफसी बॅंक कार्डने ईएमआई वर विकत घेतला तर तुम्हाला 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे या ऑफर्स फक्त 23 मे पासून 15 जून पर्यंत वैध आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कंपनीच्या वेबसाइट वरून डिवाइस विकत घेतला आणि “LAUNCHGIFT” कूपनचा वापर केला तर तुम्हाला 1,000 रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळेल. सोबतच ग्राहकांना एक वेळ स्क्रीन रिपलेसमेंट वारंटी पण मिळेल. हि ऑफर 30 जून पर्यंत उपलब्ध आहे.
स्पेसिफिकेशन
Nokia 3.2 पण Nokia 4.2 प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.26-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालेल. भारतीय बाजारात हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च होईल त्याचप्रमाणे या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी साठी नोकिया 3.2 एफ/2.2 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा तसेच सेल्फी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.2 के बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तथा साथ ही यह फोन फेस अनलॉक फीचर सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.














