4500mAh बॅटरी, 64MP क्वाड कॅमेरा व दमदार प्रोसेसर सह आले Samsung Galaxy A51 5G आणि A71 5G

Samsung ने यूएस मार्केट मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये काही नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने 2020 Galaxy A-सीरीज मध्ये Galaxy A71 5G, Galaxy A51 5G, Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 चा समावेश केला आहे. इथे आपण फक्त 5G सह सादर केले गेलेल्या Galaxy A71 5G आणि Galaxy A51 5G बद्दल बोलूया. या दोन्ही फोनचे लीक आणि माहिती अनेक दिवसांपासून समोर येत होती. आता हे फोन अधिकृतपणे सादर केले आहेत.

Galaxy A71 5G आणि Galaxy A51 5G दोन्ही फोन मध्ये Infinity-O डिस्प्ले, क्वाड कॅमेरा मॉड्यूल आणि 5G कनेक्टिविटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन्स प्रीमियम ग्लोसी फिनिश बॅक पॅनल सह येतात. विशेष म्हणजे Galaxy A51 आणि Galaxy A71 दोन्ही डिवाइस यावर्षी कंपनीने भारतात सादर केले आहेत.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy A71 5G कंपनीने Prism Cube Black, Prism Cube Sliver आणि Prism Cube Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. तसेच A51 5G कंपनीने Prism Cube Black, Prism Cube White आणि Prism Cube Pink कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या दोन्ही फोन्सच्या किंमत आणि उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Samsung Galaxy A51 5G आणि A71 5G ची डिजाइन

दोन्ही फोन्स डिजाइनच्या बाबतीत जवळपास एकसारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड एजला स्पर्श करतात. तसेच डिस्प्लेचा लोवर पार्ट पण खूप बारीक बेजल्स सह येतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. हा होल वरच्या ऐज पासून थोडा लांब आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A71 5G एंटिना बॅंड डिजाईन वर बनला आहे. फ्रंट पॅनल वरच वरच्या बाजूला स्पीकर फोटो मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे डाव्या पॅनल वर सिम स्लॉट मिळेल. फोनचा बॅक पॅनल पाहता क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात पॅनल वर उजवीकडे आहे.

Samsung Galaxy A51 5G की स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A51 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. तसेच कंपनीने या फोन मध्ये स्वतःचा Exynos 980 5G चिपसेट वापरला आहे. या फोन मध्ये 6GB आणि 8GB रॅम सह 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये f/2.0 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा मेन सेंसर, f/2.2 अपर्चर सह 12-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, f/2.2 अपर्चर सह 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि f/2.4 अपर्चर सह 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला f/2.2 अपर्चर सह 32-मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी असेल जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. फोन एंडरॉयड 10 सह सॅमसंग यूआई 2.0 वर चालतो. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी वाई-फाई 802.11 ac VHT80 MIMO, 5G, डुअल 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ 5, जीपीएस + GLONASS, यूएसबी टाइप-सी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

Samsung Galaxy A71 5G चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A71 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड प्लस इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. कंपनीने या फोन मध्ये Exynos 980 5G चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 6GB आणि 8GB रॅम सह 128GB की स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A71 5G मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर f/1.8 अपर्चर सह 64 मेगापिक्सल, f/2.2 अपर्चर सह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी गॅलेक्सी ए71 5जी मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी 25W सुपर-फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल 4G वीओएलटीई, 5G, ब्लूटूथ 5, Wi-Fi 802.11 ac VHT80 MIMO, GPS + GLONASS, यूएसबी टाइप-सी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here