चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

ऍप्पलचे नाव प्रसिद्द टेक कंपन्यांच्या टॉप यादीत येते. फक्त महाग किंमत नाही तर ऍप्पलचे प्रोडक्ट्स पण आपले मोठे मोठे दावे सिद्ध करतात. ऍप्पलचे प्रोडक्ट्स किती दमदार असतात हे ऍप्पल यूजरना माहित आहे. पण आज एक अशी धक्कादायक बाब घडली आहे ज्यामुळे फक्त ऍप्पलचे नाव प्रकाशझोतात आले नाही तर हे ऐकून सामान्य माणूस पण गोंधळेल. हि घटनाच अशी आहे ज्यात एका व्यक्तिने AirPod चुकून गिळला आणि जेव्हा तो संडासाद्वारे बाहेर आला तेव्हाही चालत होता.

झाले असे..
तैवान मधील Ben Hsu ने हि घटना सांगितली आहे. बेन ने सांगितले कि एका रात्री तो ऍप्पलच्या वायरलेस हेडफोन म्हणजे AirPod वर गाणी ऐकत होता. कानाला लावून तो झोपी गेला. जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या एका कानातला AirPod होता पण एका कानातील AirPod गायब होता. बेन ने आपल्या बेडवर आणि आजूबाजूला AirPod शोधला पण नाही मिळाला.

त्यानंतर Ben ने आपल्या iPhone ने AirPod ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅकिंग मध्ये समजले कि AirPod त्याच्या रूम मध्येच होता. ट्राक करताना त्याचे AirPod ‘बिप’ साउंड पण करत होते. बेन ने ती नोटिफिकेशन फॉलो केली. बिपच्या आवाजाचा पाठलाग करत त्याने आपला बेड, उशी, चादर आणि पांघरून सर्व शोधले पण AirPod कुठेच मिळाला नाही. सर्व शोधल्यानंतर अचानक त्याच्या लक्षात आले कि तो नोटिफिकेशन वाल्या ‘बिप’ चा आवाज त्याच्या पोटातून येत होता.

हा आवाज ऐकून बेनला समजले कि त्याचा हरवलेला AirPod दुसरीकडे कुठीही नसून त्याच्या पोटात आहे. झोपेत बेनचा AirPod कसातरी त्याच्या तोंडात पडला आणि झोपेतच तो बेन ने गिळला. AirPod बेनच्या पोटात होता, याची त्याला माहिती नव्हती. पोटातून येणारा AirPod चा आवाज ऐकताच बेन दवाखान्यात गेला.

दवाखान्यात जाऊन यूजरने x-ray काढला ज्याच्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट झाले कि बेनच्या पोटात AirPod अडकला होता. स्तिथी पाहून सर्जनने बेनला समजावले कि त्याच्या पोटाची शस्त्रक्रिया करूनच AirPod बाहेर काढावा लागेल. पण सर्जरीच्या आधी सर्जनने सुचवले कि आधी नैसर्गिकरित्या म्हणजे संडासाच्या मार्गे हा AirPod बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया.

हैराणीची बाब म्हणजे हि पद्धत कामी आली. बेनच्या पोटात गेलेला AirPod त्याच्या संडासामधून बाहेर आला. बेनने AirPod पोटातून बाहेर निघाल्याने आनंद व्यक्त केला सोबतच आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा AirPod विष्टेतून बाहेर येऊनही चालू होता आणि अगदी योग्य चालू होता. तोंडात जाऊन, पोटात राहून आणि शौचातून बाहेर येऊन पण या AirPod ची बॅटरी 41 टक्के उरली होती.

AirPod यूजरने हा ऍप्पल के वायरलेस हेडफोन धुतला आणि ड्रायरने सुखावला. तो अजुनही चालू होता. बेन या घटनेनंतर इतकेच बोलला कि ऍप्पलचा हा प्रोडक्ट एखाद्या ‘जादू’ पेक्षा कमी नाही. बेन ने The Daily Mail च्या रिपोर्ट मध्ये हि घटना सांगत म्हटले कि त्याचा AirPod सार्वजनिक शौचालयात बाहेर आला होता. या प्रोडक्टच्या वॉटरप्रूफिंगचा अंदाज यावरून लावता येतो.

बेनचा हरवलेला AirPod मिळाला, मग तो कुठूनही मिळो. पण आम्ही आमच्या वाचकांना सल्ला देऊ इच्छितो कि असा हलगर्जीपणा करू नका. तुमचा प्रोडक्ट पण वाटरप्रूफ असेल, पण तुमची तब्बेत पण बेन इतकी चांगली असेलच असे नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here