एयरटेल ने अपडेट केला आपला हे शानदार पोस्टपेड प्लान्स, आता मिळेल अनलिमिटेड डेटा आणि फ्री वॉइस कॉलिंग

भारती एयरटेल आपल्या नवीन व जुन्या सब्सक्राइबर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी अनेक दिवसांपासून आपल्या पोस्टपेड प्लान्स मध्ये अनेक बदल करत आहे. अलीकडेच कंपनीने नवीन व जुन्या प्लानच्या जीवावर जियोला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यावेळी कंपनी ने 1,599, रुपयांच्या प्लान मध्ये बदल केला आहे. आणि यात आता अनलिमिटेड डेटा आणि फ्री वॉइस कॉलिंग दिली जात आहे.

या प्लान मध्ये बदल करत कंपनी ने 399 रुपयांचा प्लान बंद करून 499 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान कंपनी ने आपल्या वेबसाइट वर लिस्ट केला आहे. आता 499 रुपयांचा प्लान कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे. यात यूजर्सना डेटा रोलओवर ऑप्शन सह 5 जीबी 3G/4G डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड लोकल/एसटीडी कॉलिंग सह यूजर्सना रोज 100 फ्री एसएमएस पण मिळतील.

तसेच जर कंपनीचा 1,599 रुपयांच्या पोस्टपेड प्लान पाहता यात बाकी बेनिफिट्स सह अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे, सोबत यूजर्सना रोज 100 फ्री एसएमएस पण मिळत आहेत.

हे देखील वाचा: 15 मे ला लॉन्च होईल रियलमीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन Realme X, सोबत येईल Realme X Youth Edition

दुसरीकडे 749 रुपयांचा पुढील प्लान पण उपलब्ध आहे. या प्लान मध्ये यूजर्सना तीन कनेक्शन मिळतात. आतील दोन रेग्युलर आणि एक डेटा ऍड-ऑन कनेक्शन मिळते. या प्लान मध्ये यूजर्सना 125 जीबी डेटा सोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग मिळते. सोबत 100 फ्री मेसेज पण रोज मिळतात.

कंपनी ने 999 रुपयांचा प्लान पण सादर केला आहे. या प्लान मध्ये चार रेग्युलर आणि एक डेटा ऍड-ऑन कनेक्शन यूजर्सना मिळते. यात यूजर्सना 150 जीबी डेटा दिला जात आहे. अनलिमिटेड वॉइस कॉलिंग सोबत यूजर्सना 100 एसएमएस रोज फ्री मिळतील.

हे देखील वाचा: आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू

त्याचबरोबर कंपनीच्या या सर्व प्लान मध्ये यूजर्सना एयरटेल थँक्स बेनिफिट मिळत आहेत, ज्यात तीन महिन्यांचे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन, एक वर्षाचे अमेझॉन ऐमजॉन प्राइम, ZEE5 आणि एयरटेल टीवीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here