नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने गेल्यावर्षी भारतीय बाजारात सादर केले गेलेले Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. या दोन्ही फोनची किंमत ऑफलाइन बाजारात कमी झाली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून या फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.
नवीन किंमत
Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. पण आता हा डिवाइस ऑफलाइन मार्केट मध्ये 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अमेझॉन इंडिया वर हा फोन अजूनही 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइट वर डिवाइस 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
त्याचबरोबर Nokia 7.2 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर या फोनच्या 4GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत आता 15,499 रुपये आणि 6GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत 17,099 रुपये झाली आहे.
Nokia 7.2 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर10 सपोर्ट सह येतो. तसेच स्क्रीन वर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4 जीबी/ 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.
एचएमडी ग्लोबल ने या फोन मध्ये पण तीन रियर कॅमेरा दिले आहेत. नोकिया 7.2 मध्ये एफ/ 1.79 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आहे. हँडसेट मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कनेक्टिविटी फीचर म्हणून वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीई चा समावेश आहे.
Nokia 6.2 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.
नोकिया 7.2 वीडियो
















