Samsung Galaxy S24 च्या लाँचपूर्वी आली डिजाइन समोर, जाणून घ्या काय असेल खास

Highlights

 • Galaxy S24 चे 5के रेंडर्स आणि व्हिडीओ लीक झाला आहे.
 • ह्यात बॉक्सी मिड फ्रेम आणि राउंडेड कॉर्नर दिसत आहे.
 • फोनमध्ये अल्ट्रावाइड बँड किंवा UWB अँटीना दिसला आहे.

सॅमसंगच्या सर्वात प्रीमियम एस-सीरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. अलीकडेच समोर आलं होतं की हे डिवाइस नवीन वर्ष 2024 च्या सुरवातीला सादर केले जाऊ शकतात. तसेच, आता सामान्य मॉडेल Samsung Galaxy S24 चे 5के रेंडर्स आणि 360 व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यात फोनची डिजाइन आणि लुक दिसत आहे. पुढे तुम्हाला याची पूरी माहिती देत आहोत.

Samsung Galaxy S24 रेंडर (लीक)

 • नवीन मोबाइल Samsung Galaxy S24 बद्दल 5के रेंडर्स आणि 360 व्हिडीओ लीक टिप्सटर ऑनलीक्स आणि स्मार्टप्रिक्सनं लीक केले आहेत.
 • तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता की Samsung Galaxy S24 मध्ये बॉक्सी बोक्सी मिड फ्रेम आणि फ्लॅट एजसह राउंडेड कॉर्नर आहेत.
 • फोनच्या डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देण्यात आली आहे.
 • विशेष म्हणजे या फोनमध्ये अल्ट्रावाइड बँड किंवा UWB अँटीना दिसला आहे. लीकनुसार हा गॅलेक्सी एस सीरीजमध्ये पहिल्यांदाच मिळू शकतो.
 • फोनच्या बॅक पॅनलवर एस23 सीरीज प्रमाणे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसला आहे. परंतु एलईडी फ्लॅशची जागा थोडीशी वेगळी दिसत आहे.
 • कलर ऑप्शन पाहता डिवाइस व्हाइट कलरमध्ये समोर आला आहे, ह्यावर मॅट फिनिश देण्यात आली आहे.
 • फोनच्या खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रँडिंग दिसत आहे.
 • एकंदरीत पाहता Galaxy S24 जुन्या एस23 प्रमाणेच वाटत आहे.
 • तसेच फोनचे डायमेंशन 147 x 70.5 x 7.6mm आहेत.

Samsung Galaxy S24 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

 • डिस्प्ले: फ्लॅगशिप फोन Galaxy S24 मध्ये डायनॅमिक M13 अ‍ॅमोलेड LTPO पॅनल मिळू शकतो. जो 120 रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकते.
 • प्रोसेसर: डिवाइसमध्ये परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 किंवा एक्सिनॉस 2400 चिपसेट लावला जाऊ शकतो. ग्राफिक्ससाठी एड्रिनो 740 जीपीयू मिळण्याची शक्यता आहे.
 • स्टोरेज: डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असण्याची चर्चा आहे.
 • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता, Galaxy S24 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स 3X ऑप्टिकल झूमसह दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
 • बॅटरी: Galaxy S24 मध्ये युजर्सना मोठ्या बॅकअपसाठी 4700एमएएचची बॅटरी आणि 45वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
 • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइसमध्ये अँड्रॉइड 14 आधारित OneUI 6 असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here