स्वस्त झाला Nokia 6.2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात Nokia 6.2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन सर्वात आधी IFA 2019 मध्ये अनाउंस केला गेला होता. लॉन्च नंतर एका महिन्यात फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. Nokia 6.2 प्राइस कट नंतर हा डिवाइस आता पर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकत घेता येईल.

ई-कॉर्मस वेबसाइट अमेझॉन इंडिया वर Nokia 6.2 स्मार्टफोनच्या किंमतीत 1,674 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर फोन 14,325 मध्ये विकत घेता येईल. फोन 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. सोबत ग्राहकांना या फोन सह काही ऑफर्स मिळत आहेत, ज्यात 7,450 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा पण समावेश आहे.

स्पेसिफिकेशन्स

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे.

फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here