27 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह आला Nokia चा स्वस्त 4G फोन

27 दिवसांच्या बॅटरी बॅकअप सह Nokia 8210 4G भारतात लाँच करण्यात आला आहे. नोकियाचा यह फीचर फोन आहे जो मोठा बॅटरी बॅकअप आणि मजबूत बॉडीसह भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. हा फोन 1999 मध्ये कंपनीद्वारे लाॅन्च करण्यात आलेला Nokia 8210 चा क्लासिक मॉडेल आहे ज्याला युजर अजूनही विसरले नाहीत. कंपनीनं हा फोन लाँच करून जुन्या मॉडेलच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जुना फोन फक्त 2G नेटवर्कला सपोर्ट करत होता तर नव्या मॉडेलमध्ये तुम्हाला आता 4G कनेक्टिव्हिटी मिळते. फोनचे अन्य फीचर्स पाहता हा UniSoc T107 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 48 MB रॅम मिळतो. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Nokia 8210 4G ची किंमत

नोकिया 8210 4जी कंपनीनं अ‍ॅमेझॉन इंडियासह मिळून लाॅन्च केला आहे. जिथे हा फोन तुम्ही 3,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच फोन डार्क ब्लू आणि रेड कलर्समध्ये सादर करण्यात आला आहे. ऑनलाइन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन व्यतिरिक्त हा नोकिया स्टोरवरून देखील पण विकत घेता येईल. फोनवर कंपनी एक वर्षांची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देत आहे.

Nokia 8210 4G चे स्पेसिफिकेशन

  • 4G कनेक्टिव्हिटी
  • FM रेडियो
  • 3.5 MM ऑडियो जॅक
  • ब्लूटूथ 5.0
  • म्यूजिक प्लेयर
  • VGA कॅमेरा

Nokia 8210 4G मध्ये तुम्हाला 3.8 इंचाची स्क्रीन मिळते. कंपनीनं यात कलरफुल QVGA डिस्प्लेचा वापर केला आहे. हा फोन UniSoc T107 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 128 एमबी मेमरीसह 48 एमबी रॅम देण्यात आला आहे. खास बाब म्हणजे या फोनमध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट देण्यात आला आहे आणि तुम्ही 32जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता, यासाठी एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो.

हा फोन ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात येतो. तसेच ऑपरेटिंग सिस्टम म्हणून ही सीरीज 30+ ओएसवर चालते. फोटोग्राफीसाठी यात 0.3 मेगापिक्सलचा VGA रिजोल्यूशन असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं एफएम रेडियो आणि म्यूजिक प्लेयर सारखे फीचर्स देखील युजर्सच्या करमणुकीसाठी दिले आहेत. यातील FM रेडियो वायर आणि वायरलेस दोन्ही मोडमध्ये वापरता येतो. म्हणजे इयरफोन्सविना देखील एफएम रेडिओचा आनंद घेता येईल.

फोनमध्ये 3.5 MM ऑडियो जॅकसह मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 5 मिळतं. बॅटरी पाहता यात 1,450 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा नोकियानं केला आहे. या फोनचं वजन फक्त 107 ग्राम आहे. यात तुम्हाला अल्फान्यूमेरिक कीपॅड मिळतो जो रबर फिनिशसह सादर करण्यात आला आहे. हा फोन त्या लोकांसाठी आहे ज्यांना कीपॅड असलेला फोन हवा आहे. स्मार्टफोन्सपासून दूर राहू इच्छिणारे लोक देखिली या फोनची निवड करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here