Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध

Xiaomi लवकरच आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन Mi 11 Ultra लॉन्च करेल. शाओमीचा हा फोन भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये 23 एप्रिल 2021 ला लॉन्च केला जाईल. शाओमीने Mi 11 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लॉन्च केला आहे. त्यामुळे शाओमीच्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचरची सर्व माहिती आधीपासून माहित आहे. Mi 11 Ultra ची किंमत पाहता भारतात शाओमीचा हा स्मार्टफोन 70,000 रुपयांची बेस किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

Mi 11 Ultra Amazon availability

शाओमीने आपला अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Ultra चा लॉन्च ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लिस्ट केला आहे. त्यामुळे शाओमीचा दमदार स्मार्टफोन विक्रीसाठी Amazon वर उपलब्ध होईल हि शक्यता आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन Mi.com आणि Mi Home stores वरून पण विकत घेता येईल.

हे देखील वाचा : iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Mi 11 Ultra स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचाचा शानदार WQHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा डिस्प्ले HDR10+ Dolby Vision सर्टिफाइड आहे आणि Gorilla Glass Victus च्या प्रोटेक्शनसह येतो. परफॉर्मन्स पाहता Mi 11 Ultra स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्ज आणि वायरलेस चार्जला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 11 Ultra चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. या कॅमेरा मॉड्यूलमध्ये 3 कॅमेरा सेंसरसह LED फ्लॅश आणि सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले व्यूफाइंडरप्रमाणे वापर करून बॅक कॅमेऱ्याने सहज सेल्फी क्लिक केली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा सेल, यात आहे 6GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Mi 11 Ultra मध्ये प्राइमेरी कॅमेरा लेंस 50 मेगापिक्सल Samsung GN2 वाइंड अँगल सेंसर आहे, तसेच दोन 48-मेगापिक्सल Sony IMX586 अल्ट्रा-वाइड-अँगल आणि टेलीफोटो-मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये देण्यात आलेला टेली-मॅक्रो कॅमेरा लेंस 5x ऑप्टिकल आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. Mi 11 Ultra स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here