Motorola लवकरच सादर करेल स्वस्त 5G फोन Moto Ibiza, यात असेल 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

मार्केट मध्ये वाढती स्वस्त 5G फोन्सची मागणी पाहता पुन्हा एकदा Motorola अफॉर्डेबल कॅटेगरी मध्ये 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या फोनचे कोडनेम Ibiza आहे. Motorola Ibiza साल 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाणार असल्याची शक्यता आहे. रिपोर्ट मध्ये या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. याआधी मोटोरोला Capri, Capri plus आणि Nio कोडनेम असलेल्या फोन्स वर काम करत असल्याची पण बातमी समोर आली आहे.

जर्मन पब्लिकेशन TechnikNews ने XDA Developers च्या ऍडम कॉन्वे सह मिळून एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार मोटोरोला इबिजा स्मार्टफोनचा मॉडेल नंबर XT02137 आहे. तसेच यात वॉटर ड्रॉच नॉच 90Hz एलसीडी एचडी+ डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल असेल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असू शकते.

हे देखील वाचा : 108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G

तसेच या फोनच्या मागे 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा असू शकतो. मागे 5 मेगापिक्सल मॅक्रो व 2 मेगापिक्सलचा सेंसर पण असेल. हँडसेट मध्ये समोर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला Ibiza मध्ये 5 जी क्षमतेसह एक स्नॅपड्रॅगॉन 400 सीरीजच्या चिपसेटचा समावेश असेल. खासकरून, लीक वरून समजले आहे कि फोन स्नॅपड्रॅगॉन SM4350 प्रोसेसर सह येईल. दुसरीकडे Snapdragon 480 5G प्रोसेसर सादर करण्यात आला आहे. आशा आहे कि मोटोरोला Ibiza 5जी क्वालकॉम चिपसेट असलेला बजेट स्मार्टफोन बनू शकतो.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत

लीक मध्ये फोनच्या डिजाइनची पण माहिती समोर आली आहे, ज्यावरून समजले आहे कि फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच असेल. खालच्या बाजूला थोडा बेजल दिसत आहे. हा फोन मोटोरोला कॅप्री डिजाइन सारखा आहे जो आपण मागच्या लीक मध्ये बघितला होता. आमच्याकडे फोनच्या मागील बाजूचा कोणताही फोटो नाही, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि कदाचित एक फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here