स्मार्टफोन मध्ये आजकाल सर्वात जास्त ट्रेंड नॉच डिसप्ले चा आहे. काही दिवसांपूर्वी नोकिया चे मालकी हक्क असणार्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करत नोकिया एक्स6 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया हा फोन सध्या चीनी बाजारात विकत आहे जो लवकरच भारतात पण लॉन्च होईल. तसेच आता नोकिया अजून एका नवीन स्मार्टफोन ची माहिती समोर आली आहे. बातमी आली आहे की कंपनी नोकिया च्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ए1 प्लस वर काम करत आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा टेक बाजारात येईल.
नोकिया ए1 प्लस बद्दल बातमी येत आहे की एचएमडी ग्लोबल या स्मार्टफोन ला फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर करेल. विनफ्यूचर ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की एचएमडी ग्लोबल नोकिया ए1 प्लस ला आईएफए 2018 ईवेंट च्या मंचावरून सादर करेल. रिपोर्ट नुसार नोकिया ए1 प्लस यूरोपियन देशांत उपलब्ध करण्यासाठी कंपनी फॉक्सकॉन सोबत मिळून काम करत आहे. नोकिया ए1 प्लस बद्दल दावा केला जात आहे की हा फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह बाजारात येईल.
रिपोर्ट्स वर विश्वास ठेवल्यास नोकिया ए1 प्लस मध्ये एलजी ने बनवलेला ओएलईडी डिस्प्ले पॅनल देण्यात येईल. तसेच फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन एंडरॉयड पी सह सादर करेल. तसेच काही लीक्स मध्ये असे पण सांगण्यात आले आहे की नोकिया ए1 प्लस मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.
नोकिया ए1 प्लस मध्ये गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड 6.01-इंचाचा डिस्प्ले असल्याची बाब पण लीक मधून समोर येत आहे. लीक नुसार फोन च्या बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल ज्यात 41-मेगापिक्सल, 20-मेगापिक्सल आणि 9.7-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर असतील. फोन चा कॅमेरा 4एक्स झूम ला सपोर्ट करेल. हा फोन आईपी68 रेटिड असेल तसेच फोन मध्ये 3,900एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण नोकिया ए1 बद्दल जो पर्यंत कंपनी कोणतीही घोषणा करत नाही तो पर्यंत फोन च्या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.