महत्वाची बातमी! 10 वर्षांपूर्वी बनवलं असेल आधार तर अपडेट करणं आवश्यक; जाणून घ्या ऑनलाइन पद्धत

आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) नं दहा वर्षांपूर्वी बनलेले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. आधार कार्ड धारक ज्यांनी आपल्या कार्डमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोणतेही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांचा आधार डेटाबेस अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UIDAI नं आधार कार्ड धारकांना ओळखीचा पुरावा आणि राहत्या पत्त्याच्या पुरावा आधार डेटाबेसमध्ये अपलोड करण्यास सांगितलं आहे. यासाठी कार्ड धारक myAadhaar पोर्टलचा वापर करू शकतात. तसेच जवळच्या आधार कार्ड सेंटरवर देखील ही सुविधा देण्यात आली आहे.

ओळखपत्र आणि पत्ता करा अपडेट

UIDAI नं एका विधानात म्हटलं आहे की, “असे भारतीय नागरिक ज्यांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड जारी करण्यात आलं होती आणि ज्यांनी या वर्षांमध्ये कधीही आधार कार्ड अपडेट केलं नाही. त्यांनी UIDAI पोर्टलवर आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे. आधार कार्ड धारक आपला आधार डेटा ऑनलाइन किंवा ऑफलाईन अपडेट करू शकतात.”

आधार कार्ड धारक आपला पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकतात. तसेच तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर ईमेलसह बायोमॅट्रिक (फिंगरप्रिंट, आयरिस आणि फोटोग्राफ) चेंज करायची असेल तर तुम्हाला जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल.

ऑनलाइन आधार कार्ड असं करा अपडेट

आधार कार्डवरील ओळखपत्र आणि पत्ता ऑनलाइन कसा अपडेट करायचा हे जाणून घेऊया.

स्टेप 1 – सर्वप्रथम आधार सेल्फ अपडेट पोर्टल uidai.gov.in ओपन करा आणि अपडेट अ‍ॅड्रेस ऑनलाइनवर सिलेक्ट करा.

स्टेप 2 – इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा VID टाकावा लागेल.

स्टेप 3 – सिक्योरिटी कोड टाकल्यांनंतर OTP रिक्वेस्ट करा, जो तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर येईल.

स्टेप 4 – मोबाइलवर आलेला OTP टाका.

स्टेप 5 – आता तुम्हाला तुमच्या पत्त्याची माहिती टाकावी लागेल आणि सबमिट बटनवर क्लिक करा.

स्टेप 6 – खाली स्क्रोल केल्यावर आता तुमच्या राहत्या पत्त्याचा एक पुरावा द्यावा लागेल. यासाठी डॉक्यूमेंटची कलर स्कॅन जवळ ठेवा आणि अपलोड करा.

स्टेप 7 – त्यानंतर BPO वर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. आता तुमची अपडेट रिक्वेस्ट आधार डेटाबेसमध्ये जमा होईल. तुमचे डॉक्यूमेंट योग्य असले तर एका आठवड्यात तुमचा पत्ता आधार डेटाबेसवर अपडेट होईल.

तुम्हाला रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलवर URN नंबर मिळेल, जो तुम्ही तुमचं अपडेट स्टेटस जाणून घेण्यासाठी वापरू शतक.

नोट: तुम्ही तुमच्या सपोर्ट डॉक्यूमेंटची स्कॅन फाईल अपलोड केली नाही तर तुमच्या आधार कार्डवरील अपडेट यशस्वी होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here