नोकियाची मोठी योजना, ऍडव्हान्स फीचर्स असलेला Nokia 10 लवकरच होऊ शकतो लॉन्च

नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global लवकरच आपल्या स्मार्टफोन्सच्या लिस्ट मध्ये एक नवीन फोन जोडणार आहे. हा नवीन फोन कंपनी Nokia 10 नावाने सादर करू शकते. रिपोर्ट्सनुसार या फोन संबंधित डॉक्यूमेंट्स nokiamob.net वर शेयर केले गेले आहेत. बोलले जात आहे कि कंपनीचा हा हँडसेट एक फ्लॅगशिप स्मार्टफोन होगा. कंपनीने आतापर्यंत याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण रिपोर्ट्सनुसार नोकिया 10 कंपनी नोकिया 9.3 प्योरव्यू सारख्या ऍडव्हान्स फीचर्स सह सादर करेल.

गूगल पिक्सल सारखा असेल Nokia 10

समोर आलेल्या या डॉक्यूमेंट मध्ये माहिती मिळाली आहे कि नोकिया कंपनी गूगल सह पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आशा आहे नोकिया 10 स्मार्टफोन गूगल पिक्सल सारखा असू शकतो. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

Nokia 9.3 Pureview

दरम्यान अशी पण बातमी येत आहे कि कंपनी Nokia 9.3 Pureview पण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. काही रिपोर्ट्सनुसार आहे कि नोकिया 9.3 प्योरव्यूच नोकिया 10 असू शकतो. कंपनीने अजूनतरी नोकिया 10 बाबत कोणतीही ऑफिशल माहिती दिली नाही.

नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 5G होऊ शकतात लॉन्च

कंपनी यावर्षीच्या शेवटपर्यंत नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 5G पण लॉन्च करू शकते. तसेच कंपनी नोकिया 9.3 फ्लॅगशिप स्मार्टफोन पण सादर करू शकते. लीक रिपोर्ट्सनुसार या फोन मध्ये कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देऊ शकते.

हे देखील वाचा : Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

Nokia चे स्मार्टफोन नंबर 1

अलीकडेच आलेल्या काउंटरपॉइंटच्या रिसर्चनुसार नोकियाचे स्मार्टफोन सॉफ्टवेयर-सिक्यॉरिटी अपडेट, बिल्ड क्वॉलिटी आणि ड्यूरेबिलिटी मध्ये 1 नंबर आहेत. यावर्षी आलेले नोकियाचे सर्व स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करते आहेत. या लिस्ट मध्ये नोकिया नंतर OnePlus, Samsung, Realme, Xiaomi, Huawei, Oppo, Lenovo, LG आणि Vivo चे नाव आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here