नोकियाचा अजून एक नवीन मोबाइल फोन मार्केटमध्ये आला आहे. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं Nokia G42 5G ग्लोबल लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिला user-repairable 5G phone आहे म्हणजे मोबाइल वापरणारी व्यक्ती स्वतः हा खोलून रिपेयर करू शकते. पुढे तुम्ही ह्या नोकिया 5जी फोनची माहिती वाचू शकता.
युजरला करता येईल फोन रिपेयर
नोकिया जी42 5जीसाठी कंपनीनं iFixit सह भागेदारी केली आहे. कंपनीचा दावा आहे की ह्याची बॅटरी, डिस्प्ले, बॅक कव्हर आणि चार्जिंग पोर्ट सारख्या गोष्टी युजर्स स्वतःहून रिपेयर करू शकतील. ह्यासाठी यासाठी कंपनी फोन बॉक्समध्ये टूल किट देखील देत आहे. तसेच मोबाइल रिपलेसमेंट पार्ट्स आयफिक्सइट द्वारे 5 वर्ष पुरवले जातील. फोनची बॉडी रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आली आहे.
Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स
- स्क्रीन : नोकिया जी42 5जी फोन 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
- प्रोसेसर : नोकिया जी42 5जी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. कंपनीनं हा 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमवर सादर केला आहे जो 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. ह्याच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया जी42 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी वेगानं करण्यासाठी मोबाइल 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.
- अन्य फीचर्स : Nokia G42 5G ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही वर चालतो. हा फोन IP52 रेटेड आहे. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.
Nokia G42 5G ची किंमत
नोकिया जी42 5जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत घोषित करण्यात आली नाही. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 199 डॉलर्समध्ये विकला जाईल जे भारतीय चालनानुसार 16,300 रुपयांच्या आसपास होतात. आशा आहे की नोकिया हा फोन लवकरच भारतीय बाजारात आणेल. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Purple आणि Grey कलरमध्ये आला आहे.
















