येत आहे स्वस्त Nokia G42 5G फोन, स्पेसिफिकेशन्ससह सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

Highlights

  • गीकबेंच लिस्टिंग 7 जूनची आहे.
  • फोनचं नाव समोर आलं आहे.
  • ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळेल.

नोकियाचं नाव अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये आता जास्त सक्रिय झालं आहे. कंपनीनं गेल्या काही महिन्यात अनेक मोबाइल मार्केटमध्ये आले आहेत आणि आता ब्रँड एका नवीन 5जी फोनवर देखील काम करत आहे. हा नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G असेल जो बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे.

Nokia G42 5G बेंचमार्क डिटेल

  • नवीन नोकिया फोन गीकबेंचवर HMD Global Nokia G42 5G नावाने लिस्ट करण्यात आला आहे.
  • इथे नोकिया जी42 5जीला सिंगल-कोर मध्ये 738 आणि मल्टी-कोर मध्ये 1718 स्कोर मिळाला आहे.
  • गीकबेंचवर फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे. हा स्टॉक अँड्रॉइड असू शकतो.
  • फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘shadow’ लिहिण्यात आलं आहे. ज्याच्या नावाची माहिती मिळाली नाही परंतु हा एक लोवर मिड रेंज प्रोसेसर असेल.
  • हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल ज्याचा बेस क्लॉक स्पीड 1.90गीगाहर्ट्झ असेल.
  • हा प्रोसेसर 2.21गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
  • गीकबेंचवर Nokia G42 5G फोन 4जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

नोकिया जी42 5जी फोन संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आली नाही परंतु काही रिपोर्ट्स व लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅमसह लाँच होईल जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाईल. तसेच फोनमध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते. लीक्स नुसार Nokia G42 5G purple आणि gray कलरमध्ये मार्केटमध्ये येईल.

Nokia C32 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

  • प्राइस : नोकिया सी32 अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
  • स्क्रीन : Nokia C32 को 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसहवर लाँच करण्यात आला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी फोनला 2.5डी ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : नोकिया सी32 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 2जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्या फोनला 6जीबी रॅमची पावर देतो.
  • कॅमेरा : Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच हा नोकिया फोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोकिया सी32 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Nokia C32 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. ह्यात 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • सिक्योरिटी : फोन अनलॉक व सिक्योरिटीसाठी नोकिया सी32 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here