नोकिया मोबाईल ने काही दिवसांपूर्वीच माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून सांगितले होते की कंपनी येणार्या 16 मे ला आपला आगामी नॉच डिसप्ले वाला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया एक्स सादर करणार आहे. हा फोन जागतिक बाजारात नोकिया एक्स किंवा मग नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनी ने फोन ची स्पेसिफिकेशन व किंमती बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु फोन च्या अधिकृत लॉन्च च्या आधी याचा एक वीडियो समोर आला आहे. या वीडियो मधून फोन च्या डिजाईन व डिसप्ले ची माहिती मिळाली आहे.
नोकिया एक्स चा हा वीडियो स्लॅशलीक ने आपल्या यूट्यब चॅनल वर शेयर केला आहे. हा वीडियो 13 सेकंदाचा आहे ज्यात फोन हातात घेऊन दाखविण्यात आला आहे. हा फोन आॅन आहे तसेच याचा फ्रंट, साईड व बॅक पॅनल वीडियो मध्ये कॅप्चर करण्यात आले आहेत. फोन च्या डिसप्ले वर 16 मे तारीख लिहिण्यात आली आहे ज्यादिवशी फोन पहिल्यांदा टेक जगासमोर सादर केला जाईल.
वीडियो नुसार नोकिया एक्स च्या बॅक पॅनल वर कार्ल जेसिस चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप सह एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे ज्याच्या खाली नीचे फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. नोकिया एक्स फुल बेजल लेस डिसप्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याचे किनारे कर्व्ड आहेत. फोन च्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बारीक बेजल आहे ज्यावर ‘नोकिया’ लिहले आहे. तसेच फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर की आहे.
नोकिया एक्स बद्दल आलेल्या लीक्स नुसार हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल. लीक नुसार हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च होईल. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम असेल आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल तर दुसर्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल आणि क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल.
4जीबी रॅम वेरिएंट मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच 6जीबी रॅम वाल्या वेरिएंट मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 12-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो. पण नोकिया एक्स च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.














