हल्ली स्मार्टफोन फक्त फोनचं काम करत नाही तर काहींसाठी स्मार्टफोनचा कॅमेरा त्यापेक्षाही महत्वाचा असतो. ही बाब लक्षात ठेवून HONOR कंपनी येत्या 23 नोव्हेंबरला आली नवीन फ्लॅगशिप सीरीज HONOR 80 series टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीनं सीरीजमधील स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत परंतु आशा आहे की 23 नोव्हेंबरला HONOR 80 SE 5G, HONOR 80 5G आणि HONOR 80 Pro 5G लाँच होऊ शकतात. पुढे आम्ही ऑनर 80 सीरीजचे लाँच डिटेल शेयर करण्यासोबतच ऑनर 80, ऑनर 80 एसई आणि ऑनर 80 प्रोच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला आहे जे लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत.
या दिवशी लाँच होईल HONOR 80 Series
ऑनर 80 सीरीज येत्या 23 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. यादिवशी HONOR 80 Series चीनमध्ये लाँच होईल त्यानंतर अन्य मार्केट्समध्ये येऊ शकते. परंतु भारतीयांच्या वाट्याला ऑनर 80, ऑनर 80 एसई आणि ऑनर 80 प्रो स्मार्टफोन येणार नाहीत कारण सध्या ऑनर ब्रँड भारतीय बाजारात जास्त अॅक्टिव्ह नाही. पावरफुल कॅमेरा असलेली ऑनर 80 सीरीज भारतीय वेळेनुसार 23 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता टेक मार्केटमध्ये लाँच केली जाईल. हे देखील वाचा: सॅमसंगचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मिळतोय अत्यंत स्वस्तात; 5G कनेक्टिव्हिटीसह 4 शानदार कॅमेरे

HONOR 80 Series चा कॅमेरा (लीक)
ऑनर 80 सीरीज सीरीज पावरफुल कॅमेऱ्यांसह बाजारात येईल, अशी चर्चा आहे. समोर आलेल्या लीक्सनुसार सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल HONOR 80 Pro 5G मध्ये 160 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो एफ/1.8 अपर्चरसह येईल. तसेच या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच कंपनीनं देखील चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबोच्या माध्यमातून आपल्या आगामी स्मार्टफोन सीरिजच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

HONOR 80 Series चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्सनुसार, सीरीजचा बेस मॉडेल HONOR 80 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. HONOR 80 SE स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह बाजारात येईल, अशी माहिती लीकमध्ये समोर आली आहे. तर HONOR 80 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो ज्याला 3.2गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड मिळेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.