अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये सॅमसंग की गॅलेक्सी एस सीरीजचा दर्जा वेगळाच आहे. कंपनीच्या Samsung Galaxy S22 सीरीजनं भारतीय बाजारात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत आणि आता Samsung Galaxy S23 सीरीज देखील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येण्यास तयार होत आहे. Samsung Galaxy S23 Series Launch Timeline समोर आली आहे आणि बातमी येत आहे की पावरफुल गॅलेक्सी एस23 सीरीज फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकते.
Samsung Galaxy S23 सीरिज लाँच
सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीज लाँच बद्दल नवीन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की ही फ्लॅगशिप सॅमसंग स्मार्टफोन सीरीज फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनी अमेरिकेत Samsung Unpacked event चं आयोजन करू शकते आणि या मंचावरून Samsung Galaxy S23 Series लाँच होऊ शकते. या सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra लाँच होऊ शकतात, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 12 नव्हे 13 महिने चालेल BSNL चा ‘हा’ प्लॅन; एयरटेल-जियोपेक्षा कमी किंमत आणि रोज 2GB डेटा
Samsung Galaxy S23 5G
सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीजचा बेस मॉडेल Samsung Galaxy S23 5G असू शकतो. आतापर्यंत समोर आलेल्या डिटेल्सनुसार हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो अॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. ही स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येऊ शकते आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.
Samsung Galaxy S23 5G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट सीरीजच्या अन्य मॉडेल्स Samsung Galaxy S23 Plus आणि S23 Ultra मध्ये देखील मिळू शकतो. तसेच लीकनुसार गॅलेक्सी एस23 5जी फोन 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो तसेच 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा मध्ये 16जीबी रॅम दिला जाऊ शकते. हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल OnePlus 11; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23 5G मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनच्या बॅक कॅमेराची माहिती समोर आली नाही परंतु Samsung Galaxy S23 Ultra बद्दल सांगण्यात आलं आहे की या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.