लो बजेट Nokia X20 5G लवकरच भारतात करेल एंट्री, लीकमध्ये झाला मोठा खुलासा

नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी कंपनी HMD Global पुढल्या महिन्यात 8 एप्रिलला एका इवेंटचे आयोजन करणार आहे. इवेंटमध्ये अनेक किफायती स्मार्टफोन्स लॉन्च होण्याची शक्यता आहे, ज्यात Nokia X20, Nokia X10 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. या तिन्ही फोन पैकी नोकिया एक्स20 5G ला कथितरित्या यूएस फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC) सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि कथितरित्या भारतीय IMEI डेटाबेसवर पण दिसला आहे, त्यामुळे इशारा मिळतो कि फोन भारतात लॉन्च केला जाईल. पण नोकिया ब्रँडच्या लाइसेंसधारी HMD Global ने स्मार्टफोनबाबत अजूनही कोणीतही अधिकृत माहिती दिली नाही. याआधी नोकिया X20 5G गीकबेंचवर दिसला होता जिथे यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 SoC असल्याचा दावा केला गेला होता.

वेबसाइटवर लिस्ट झाला Nokia X20

MySmartPrice वेबसाइटवर हा फोन सर्टिफिकेशन लिस्टिंगमध्ये दिसला आहे. फोन मॉडेल नंबर TA-1341 सह भारतीय IMEI डेटाबेसवर दिसला आहे. असे तेव्हा होते जेव्हा एखादा फोन देशात लॉन्च होणार असतो आणि त्यामुळे येत्या आठवड्यांमध्ये X20 भारतात लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च

Nokia X20 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन

सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे Nokia X20 5G वेरिएंटला FCC वरून सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. फोन पुन्हा एकदा मॉडेल नंबर TA-1341 सह लिस्ट केला गेला आहे आणि असे सांगण्यात आले आहे कि हा 5G सपोर्टसह येईल. लिस्टिंगमध्ये एक स्केच समोर आला आहे ज्यात फोनचा रियर पॅनल दिसतो. तुम्ही फोनच्या मागे असलेला सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल फोटोमध्ये पण बघू शकता.

तसेच गीकबेंच लिस्टिंगमध्ये समोर आले होते कि फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगॉन 480 प्रोसेसर असेल जो एक परवडणारा 5G चिपसेट आहे. चिपसेट व्यतिरिक्त लिस्टिंगवरून समजले आहे कि फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि फोन Android 11 OS वर चालतो.

हे देखील वाचा : 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट

Nokia G10

अलीकडेच एका लीकच्या माध्यमातून Nokia G10 ची माहिती समोर आली होती. समजले होते कि फोनमध्ये 6.38 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर, 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here