नोकिया ​6.1 प्लस असेल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव

नोकिया उद्या म्हणजे 21 ऑगस्टला भारतात एका मोठ्या ईवेंट चे आयोजन करणार आहे. नोकिया ने अजूनतरी या ईवेंट मध्ये सादर होणाऱ्या फोनचे नाव सांगितले नाही, पण बोलले जात आहे की उद्या कंपनी भारतात आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस नावाने लॉन्च करेल. काही ठिकाणी नोकिया 9 ची पण चर्चा आहे पण नोकिया 6.1 प्लस लॉन्च होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच फोन लॉन्च आधीच फ्लिपकार्ट ने एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यावरून समजते कि नोकियाचा हा येणारा स्मार्टफोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल.

भारतातील प्रसिद्ध संगीतकार शंकर, एहसान आणि लॉय या वीडियो मध्ये आहेत. या वीडियो मध्ये ते नोकिया ची जग प्रसिद्ध ट्यून वाजवत आणि गुणगुणत आहेत आणि त्यात शंकर महादेवन यांनी सांगितले आहे की फ्लिपकार्ट उद्या एक मोठे सादरीकरण करणार आहे. या वीडियो टीजर वरून स्पष्ट झाले आहे की नोकिया उद्या देशात जो फोन लॉन्च करणार आहे तो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल. नोकिया चा हा ईवेंट लाईव बघण्यासाठी (इथे क्लिक करा)

नोकिया इंडिया ने एक कँपेनची सुरवात केली आहे, ज्यात नोकिया फॅन्सना त्यांचे आवडीच्या नोकिया स्मार्टफोनचा कोणताही एक खास अनुभव शेयर करायला सांगण्यात आले आहे. नोकिया च्या या कॅपेंन मधील या स्पर्धेच्या विजेत्याला कंपनीच्या लॉन्च ईवेंट मध्ये जाण्याचे निमंत्रण मिळेल. नोकिया चे मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल उद्या नोकिया 6.1 प्लस भारतीय बाजारात सादर करू शकते.

नोकिया 6.1 प्लस अंर्तराष्ट्रीय बाजारात जवळपास 20,000 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल.

चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम/32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम /64जीबी स्टोरेज च्या 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता पण ग्लोबल मंचावर कंपनी ने फक्त 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर केला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात नोकिया 6.1 प्लस किती रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच याची किंमत किती असेल आणि हा कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी उद्याच्या लॉन्च ईवेंट ची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here