लॉन्च झाला नोकिया चा पहिला नॉच डिसप्ले असलेला स्मार्टफोन नोकिया एक्स6, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह आहे स्टॉक एंडरॉयड

नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने खुप काळानंतर आपला नवीन डिवाईस अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. नोकिया फॅन्सना भेट कंपनी ने नोकिया एक्स6 लॉन्च केला आहे. नोकिया ने हा फोन सध्यातरी चीनी बाजारात आणला आहे तिथे हा 3 वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. चीन मध्ये या फोन ची सुरवाती किंमत 1,299 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 13,800 रुपये आहे.

नोकिया एक्स6 कंपनी चा पहिला असा एंडरॉयड स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया एक्स6 मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया एक्स6 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया एक्स6 तीन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 1,299 युआन (जवळपास 13,800 रुपये), 1,499 युआन (जवळपास 16,000 रुपये) तसेच 1,699 युआन (जवळपास 18,000 रुपये)आहे. तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. चीन मध्ये नोकिया एक्स6 ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here