108MP कॅमेऱ्यासह Realme 10 Pro Plus 5G चीनमध्ये लाँच

रियलमी कंपनीनं बद्दल गेले कित्येक दिवस बातमी येत होती की कंपनी Realme 10 Pro Series लाँच करणार आहे. त्यानुसार कंपनीनं आत दोन नवीन 5जी रियलमी फोनसह ही सीरिज लाँच केली आहे. रियलमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G सादर केले आहेत. हे दोन्ही हँडसेट सर्वप्रथम चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होतील त्यानंतर भारतीयांच्या भेटीला येतील. यातील हायएंड मॉडेल रियलमी 10 प्रो प्लस 5जी च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Realme 10 Pro Plus Specifications

रियलमी 10 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल मिळतो. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ही कर्व एज स्क्रीन आहे जी 2160Hz PWM डीमींग टेक्नलॉजीला सपोर्ट करते. तसेच सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्मूद डिस्प्लेसह Realme 10 Pro लाँच! कमी किंमतीत मिळतील रेडमीपेक्षा दमदार स्पेसिफिकेशन्स

Realme 10 Pro Plus अँड्रॉइड 13 ओएसवर आधारित कंपनीच्या रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे, या चिपसेटसह येणारा हा पहिलाच फोन आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं या फोनमध्ये 20GB पर्यंत रॅमची ताकद मिळवता येते. पावर बॅकअपसाठी यात 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हे देखील वाचा: कोणालाही न सांगता Jio नं बंद केले दोन लोकप्रिय प्लॅन; नवीन पर्याय न दिल्यामुळे युजर्स नाराज

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो प्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला आणखी 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 10 Pro Price

Realme 10 Pro Plus स्मार्टफोन चीनमध्ये तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आणि 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 1,699 युआन (सुमारे 19,400 रुपये) आहे तर मोठे व्हेरिएंट अनुक्रमे 1,999 युआन (सुमारे 22,900 रुपये) आणि 2,299 युआन (सुमारे 22,900 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. Realme 10 Pro Plus स्मार्टफोन चीनमध्ये Sea Blue, Night Black आणि Starlight कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here