108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो Realme 10 Pro+ 5G; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

Realme 9 Pro Plus

Realme 10 series 17 नोव्हेंबरला टेक मंचावर सादर केली जाईल. कंपनीनं आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Realme 10 4G, Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G फोन लाँच केले जाऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी 10 प्रो प्लस 5जी या सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असू शकतो. हे रियलमी मोबाइल्स भारतात कधी लाँच होती याची ठोस माहिती समजली नाही परंतु 17 नोव्हेंबरच्या ग्लोबल लाँचच्या आधी Realme 10 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार फोनमध्ये 108MP कॅमेरा, 6.7 इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉइड 13 आणि 12GB रॅम मिळू शकतो.

Realme 10 Pro+ 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो प्लस 5जीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या डिटेल्सनुसार हा रियलमी मोबाइल 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. इथे स्क्रीन स्टाईलची तर माहिती मिळाली नाही परंतु आशा आहे की या पंच-होल डिजाईन मिळू शकते. लिस्टिंगमध्ये फोनचे डायमेंशन 161.5 x 73.9 x 7.95एमएम आणि वजन फक्त 172 ग्राम असू शकतं. हे देखील वाचा: वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी

Realme 10 Pro+ 5G फोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच केला जाऊ शकतो जो रियलमी युआयसह मिळून काम करू शकतो. लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की रियलमी 10 प्रो प्लस 5जी स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालू शकतो. हा प्रोसेसर 2.6गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला प्रोसेसर आणि माली-जी68 जीपीयू आणि हायपरइंजिन 3.0 गेमिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच ड्युअल मोड 5जी (SA/NSA) वर चालू शकेल.

रियलमी 10 प्रो प्लस 5जी व्हेरिएंट्स पाहता चीनी टेलीकॉम वेबसाइटवर हा मोबाइल तीन व्हेरिएंट्समध्ये लिस्ट झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असू शकते. तसेच दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळू शकते. पावर बॅकअपसाठी Realme 10 Pro Plus मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

रियलमी 10 प्रो प्लस 5जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लिस्टिंगनुसार फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो/डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: BSNL बंद करणार आहे 75 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन; लवकरच घ्या फायदा

Realme 10 Pro+ 5G Launch Date

Realme 10 Pro+ 5G फोन चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. वर सांगितलेल्या रियलमी स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्सचा खुलासा याच वेबसाइटवरून झाला आहे. या लिस्टिंगमध्ये रियलमी 10 प्रो+ लाँच डेट 17 नोव्हेंबर असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. जी फोनची चायना लाँच डेट आहे आणि कंपनीद्वारे ऑफिशियल करण्यात आली आहे. वेबसाइटवर लिस्ट झालेला स्मार्टफोन देखील चायना मॉडेलच आहे ज्याची स्पेसिफिकेशन्स भारतात लाँच होणाऱ्या मॉडेल पेक्षा थोडे वेगळे असू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here