काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया फोन चे मालकी हक्क असलेली कंपनी एचएमडी ग्लोबल लवकरच नोकिया एक्स फोन लॉन्च करू शकते. आता नवीन बातमी समोर आली आहे. मिळालेल्या सूचनेनुसार नोकिया एक्स फोन 27 एप्रिलला चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष बाब ही आहे की आधी बोलेल जात होते की हा एक महाग फोन असेल पण आता समोर येत आहे की हा एक माध्यम बजेट फोन असेल. त्याचबरोबर याचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत.
सर्वात आधी फोन अरीना ने एका चीनी वेबसाइट च्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. माहिती नुसार एचएमडी ग्लोबल कडून नोकिया एक्स6 नावाने हा फोन लॉन्च केला जाईल. यात तुम्हाला नॉच स्क्रीन वाला बेजल लेस डिसप्ले मिळेल. माहितीनुसार 27 एप्रिलला कंपनी चीन मध्ये हा फोन लॉन्च करणार आहे.
नोकिया एक्स6 मध्ये 5.8-इंचाचा 19:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. तर मागच्या पॅनल मध्ये नोकिया 7 प्लस प्रमाणे डुअल कॅमेरा दिला जाऊ शकतो. अन्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 6जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. बातमीनुसार हा हेलियो पी60 चिपसेट वर पण सादर केला जाऊ शकतो आणि त्या मॉडेल मध्ये 4जीबी रॅम असेल.
नोकिया एक्स6 मध्ये तुम्हाला 2 गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल आणि हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित असेल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. चांगल्या फोटोग्राफी साठी कंपनी यात कार्लजीज लेंस देऊ शकते. तर सेकेंडरी कॅमेरा 13-मेगापिक्सल चा दिला जाण्याची शक्यता आहे.
दिलेल्या माहितीनुसार डुअल सिम आधारित या फोन मध्ये एक नॅनो सिम चा वापर केला जाऊ शकतो तर यातील एक स्लॉट हाईब्रीड असेल. जिथे तुम्ही सिम किंवा मेमरी कार्ड पैकी एक वापरू शकाल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. तर कनेक्टिविटी साठी यूएसबी टाइप मिळेल.