Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

Highlights

  • Nothing Phone (2) चं नाव ऑफिशियल झालं आहे.
  • हा फोन जून महिन्यांनंतर मार्केटमध्ये लाँच होईल.
  • यात पण ट्रान्सपरंट बॉडी आणि ग्लिफ लाइट मिळेल.

Nothing Phone (1) बाजारात येण्यापूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. हटके ट्रान्सपरंट डिजाईनमुळे लोकांना खूप आवडला आहे. आज नथिंग ब्रँडनं अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते आपला दुसरा स्मार्टफोन घेऊन येत आहेत आणि हा मोबाइल Nothing Phone (2) नावानं लाँच होईल.

नथिंग फोन (2) लाँचची घोषणा

नथिंग कंपनीनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून नवीन फोन लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं ट्वीटमध्ये स्पष्टपणे Nothing Phone (2) च्या नावाचा खुलासा केला आहे. या ट्वीट व्यतिरिक्त कंपनीनं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर देखील फोनचं पेज लाइव्ह केलं आहे जे तुम्ही (इथे क्लिक करून) पाहू शकता.

Nothing Phone (2) कब लाँच केला जाईल

कंपनीनं फोनच्या नावाची माहिती देण्यासोबतच असं देखील सांगितलं आहे की Nothing Phone (2) या उन्हाळ्यात बाजारात येईल. नथिंगनं सध्या कोणतीही ठराविक तारीख मात्र सांगितली नाही परंतु स्पष्ट सांगितलं आहे की ब्रँडचा फोन (2) जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बीच लाँच होईल.

नथिंग फोन (2) मधील फिचर

  • ट्रान्सपरंट बॉडी
  • प्रीमियम डिजाईन
  • ग्लिफ लाइट
  • अलर्ट स्लायडर

नथिंग ब्रँडचे सीईओ कार्ल पेई यांनी आधी सांगितलं आहे की Nothing Phone (2) एक प्रीमियम फोन असेल जो जुन्या नथिंग फोन 1 च्या तुलनेत जास्त अ‍ॅडव्हान्स असेल. तसेच या फोनमध्ये आधीप्रमाणे ट्रान्सपरंट बॉडी मिळेल. या मोबाइलमध्ये ट्रान्सपरंट बॉडी एलिमेंटचा वापर केला जाईल ज्यामुळे फोनमधील पार्ट्स बाहेरून पाहता येतील.

Nothing Fold (2) मध्ये ग्लिफ लाइटिंग देखील मिळू शकते. हा एक एलईडी स्ट्रिप्सचा सेट आहे जो फोन बॉडी मध्ये फिट होत तसेच नोटिफिकेशन किंवा कॉल आल्यावर ब्लिंक होतो. या फोनमध्ये एक डेडिकेटेड बटन असू शकतं जे वनप्लसच्या अलर्ट स्लाइडर किंवा आयफोनच्या साइड स्वीच बटन प्रमाणे काम करेल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 8 series SoC
  • 12GB RAM + 256GB storage

नथिंग फोन (2) बद्दल कंपनीनं सांगितलं आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या 8 सीरीज मधील स्नॅपड्रॅगन चिपसेटसह लाँच होईल. आशा आहे की यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाऊ शकते.

  • 120Hz AMOLED display
  • 5,000mAh battery

समोर आलेल्या लीक्स नुसार Nothing Phone (2) मध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. तसेच वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील नवीन नथिंग फोनमध्ये मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here