Categories: बातम्या

55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक

Amazon चा Great Indian Festival Sale आणि Flipkart चा The Big Billion days सेल म्हणजे भारतीयांसाठी शॉपिंगचा उत्सव. दोन्ही ई-कॉमर्स साइट्स आपले सेल जोरदार प्रोमोट करत आहेत तसेच डील्स व ऑफर्स देत आहेत. सूट व डिस्काउंट सोबतच ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या लोकांची फसवणूक देखील होत आहे. Online Fraud ची अशीच एक नवीन केस समोर आली आहे ज्यात अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमधून 54,999 रुपयांचा OnePlus 10T 5G Phone ऑर्डर करण्यात आला होता त्याऐवजी 5 रुपयांच्या भांडी घासण्याचा Exo साबण मिळाला आहे.

वनप्लस मोबाइलच्या डब्ब्यात भांडी घासण्याचा साबण

ही बातमी टाइम्सनाउच्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार ही घटना मुबईमधील अशोक भंबानी या ग्राहकासोबत घडली आहे. रिपोर्टनुसार अशोकनं अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या पहिल्याच दिवशी शॉपिंग साइटवर वनप्लस ब्रँडचा नवीन मोबाइल फोन वनप्लस 10टी 5जी ऑर्डर केला होता, ज्याची किंमत 54,999 रुपये आहे. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 13GB RAM च्या दमदार स्पेक्ससह लाँच झाला नवा फोन; किंमत 15 हजारांच्या आत

OnePlus 10T 5G Phone अशोकनं सकाळी ऑर्डर केला होता जो त्याच तारखेला संध्याकाळी त्याची घरी डिलिव्हर करण्यात आला होता. रिपोर्टनुसार अशोकनं ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतर ती न उघडताच रिसिव्ह केली तसेच बॉक्स उघडण्यासाठी त्याने नवरात्री सुरु होण्याची वाट बघितली.

54,999 रुपयांच्या फोन बॉक्समध्ये 5 रुपयांच्या साबण

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या सोमवारी अशोक भंबानीनं मोठ्या उत्साहाने आपल्या नवीन स्मार्टफोनची अनबाक्सिंग करण्याची तयारी केली आणि तो बॉक्स ओपन केला. परंतु फोन बॉक्स ओपन करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. वनप्लस 10टी 5जी फोनच्या बॉक्समध्ये कोणताही मोबाइल फोन नव्हता तसेच स्मार्टफोनच्या ऐवजी त्यात भांडी घासण्याच्या साबणाच्या वड्या होत्या.

54,999 रुपयांच्या OnePlus 10T 5G फोनच्या बॉक्समध्ये 5 रुपयांचा साबण पाहून अशोकला आपल्या सोबत फसवणूक झाल्याचं समजलं. या फ्रॉडची माहिती देऊन अशोकनं अ‍ॅमेझॉन कस्टमर सर्व्हिसकडे तक्रार केली आहे तसेच ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात पुढे काय होईल? अशोकला नुकसान भरपाई दिली जाईल? की नवीन स्मार्टफोन पाठवला जाईल? ही माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

फ्लिपकार्टनं देखील पाठवल्या साबणाच्या वड्या

Flipkart Big Billion Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी शर्मा याने ऑफर पाहून वडिलांसाठी 50 हजारांचा लॅपटॉप ऑर्डर केला. परंतु फ्लिपकार्टनं लॅपटॉपच्या बॉक्समध्ये घडी डिटर्जंट साबणाच्या वड्या पाठवल्यामुळे ग्राहकाचे डोळे उघडले. फ्लिपकार्टनं हे प्रकरण पुढे नेण्यास नकार दिला आहे, कारण ओपन बॉक्स डिलिव्हरी असताना देखील ग्राहकाने डिलिव्हरी बॉय समोर बॉक्स ओपन करून प्रोडक्टची खात्री करून घेतली नाही. हे देखील वाचा: डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या

Published by
Siddhesh Jadhav