आगामी OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स लीक, सर्वप्रथम चीनमध्ये होऊ शकतो लाँच

वनप्लस 11 स्मार्टफोन संबंधित नवीन माहिती डिजीटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर वनप्लस 11 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे तसेच दावा करण्यात आला आहे की हा स्मार्टफोन यावर्षीच्या अखेरीस बाजारात लाँच केला जाऊ शकतो. म्हणजे OnePlus 11 डिसेंबर संपण्याआधी लाँच होऊ शकतो. सर्वप्रथम चीनमध्ये आगामी वनप्लस स्मार्टफोन लाँच होईल मग याची एंट्री भारत व अन्य बाजारपेठांमध्ये होऊ शकते.

OnePlus 11 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 16GB RAM
  • 6.7″ QHD+ 120Hz AMOLED डिस्प्ले
  • 50MP + 48MP + 32MP Rear Camera
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट
  • 100W Fast Charging

वनप्लस 11 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या लार्ज क्वॉडएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये पंच-होल स्टाईल स्क्रीन मिळू शकते जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकते. हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळू शकते.

OnePlus 11 मध्ये प्रोसेसिंगसाठी आतापर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करू शकतो तसेच यात 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोनचा सर्वात छोटा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये शानदार कॅमेरा सेटअप मिळू शकतो. रिपोर्टमधून समोर आलं आहे की यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेऱ्याचा समावेश असू शकतो. यात Hasselblad लेन्स असेल जी शानदार फोटो व व्हिडीओ कॅप्चर करू शकते. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

OnePlus 11 स्मार्टफोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची वायर्ड चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते तसेच फोनमध्ये वायरलेस फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असण्याचा खुलासा देखील लीकमध्ये झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here