वनप्लस 11 सीरीज येत्या 4 जानेवारीला चीनमध्ये एंट्री करू शकते. तसेच OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात, जे 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात देखील ऑफिशियल केले जाऊ शकतात. या दोन्ही स्मार्टफोन्ससह कंपनी OnePlus 11R देखील सादर करू शकते, अशी चर्चा आहे. या फोन संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही परंतु एक नवीन लीकमध्ये वनप्लस 11आरचे लाइव्ह फोटोज शेयर करण्यात आले आहेत.
OnePlus 11R ची डिजाईन
लीक झालेल्या फोटोमध्ये वनप्लस 11आरचा फ्रंट आणि रियर पॅनल दोन्ही दाखवण्यात आले आहेत. पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी कर्व्ड एजसह येऊ शकतो. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे जो बॉडी एजपासून थोडा दूर आहे. तर बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर जहां वॉल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आलं आहे तर डावीकडे लोकप्रिय अलर्ट स्लाइडर पुन्हा एकदा वनप्लस फोनमध्ये दिसत आहे. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 11आरचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्सनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 16 जीबी पर्यंतच्या रॅमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. तसेच स्मार्टफोनचा 12जीबी रॅम व 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी OnePlus 11R ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील रियर कॅमेरा सेटअपमध्ये दिली जाऊ शकते. सेल्फीसाठी यात 16एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; या प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज
OnePlus 11R मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्यात 2के रिजोल्यूशन मिळू शकतं. लीकनुसार ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. पावर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचा लीकमध्ये समोर आलं आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकते.

















