420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

2023 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करत BYD नं नवीन ई-कार लाँच केली आहे. कंपनीनं चीनमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार 2023 Dolphin नावानं सादर करण्यात आली आहे. लुकच्या बाबतीत या कारमध्ये आकर्षक डिजाईन देण्यात आली आहे. तसेच या कारची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर ही E-Car 420 किलोमीटर पर्यंत धावू शकते. ही कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनवण्यात आली आहे. तसेच यात LPF ब्लेड बॅटरी वापरण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत

BYD ने 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची किंमत 16,700 अमेरिकन डॉलर ठेवली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत प्राइस 13 लाख 83 हजार रुपये होते. सध्या ही कार फक्त चीनमध्ये विकली जाईल. तसेच दुसऱ्या बाजारात ही ई-कार सादर करण्याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: वनप्लसची गादी धोक्यात? 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह धमाकेदार iQOO Neo 7 Racing Edition लाँच

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारची डिजाइन

ही ई-कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर बनली आहे. तसेच मरीन एस्थेटिक्स डिजाइन कॉन्सेप्टवर बनवण्यात आली आहे. डॉल्फिन ईव्हीचा शेप खूप सिंपल आणि स्टाइलिश दिसतो. यात फ्लॅट बॉटम मल्टी फंक्शन असलेलं स्टीयरिंग व्हील देण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5 इंचाचा फुल एलसीडी इंस्ट्रूमेंट पॅनल आहे आणि कारमध्ये 12.8 इंचाची सेंट्रल कंट्रोल स्क्रीन देण्यात आली आहे. कारचे डाइमेंशन पाहता 4070/1770/1570mm असे आहेत.

BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Dongchedi.com नुसार या ई-कारमध्ये 44.9kW ची बॅटरी कपॅसिटी असलेली BYD ब्लेड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 420 किमी पर्यंतच्या एनईडीसी प्योर इलेक्ट्रिक क्रूजिंग रेंज देते. कंपनीनुसार, डॉल्फिन BYD मध्ये प्योर इलेक्ट्रिक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी न्यू जनरेशन युजर्ससाठी बनवण्यात आली आहे. तसेच कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन आउटपुट ऑप्शन असलेली मोटर दिली आहे. हे देखील वाचा: 6GB RAM सह समोर आला Samsung Galaxy A34 5G; लवकरच येणार बाजारात

यात एक ऑप्शन 70 kW/180Nm चा आहे आणि दुसरा आउटपुट ऑप्शन 130 kW/290 Nm चा मिळतो. दोन आउटपुट ऑप्शनसह येणारी ही कार 420 किलोमीटरची अफलातून रेंज देते. तर, दुसऱ्या आउटपुट ऑप्शनच्या मदतीनं ही सिंगल चार्जमध्ये 401 किलोमीटर पर्यंत चालवता येते. 70 kW/180Nm आउटपुटसह कार 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग 10.9 सेकंदात गाठू शकते. तर 130 kW/290 Nm आउटपुट मध्ये हा वेळ 7.5 सेकंड होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here