थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; Prime Video वर झाला रिलीज

Drishyam 2 OTT ची प्रतीक्षा आता संपली आहे. अजय देवगन, तब्बू आणि श्रिया सरनचा चित्रपट ‘दृश्यम 2’ ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. परंतु चित्रपट रेंट नाउ ऑप्शन अंतगर्त Prime Video वर रिलीज करण्यात आला आहे. म्हणजे जर तुम्ही प्राइम मेंबर असलात तरी देखील हा चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दर्शकांसाठी एक मोठी बातमी आहे. चला जाणून घेऊया हा चित्रपट बघण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील.

दृश्यम 2 बघण्यासाठी द्यावे लागतील इतके पैसे

‘दृश्यम 2’ यंदा प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. तसेच, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट बघण्यासाठी आता तुम्हाला 199 रुपये द्यावे लागतील. म्हणजे जरी तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन असलातरी हा चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला Rent वर घ्यावा लागेल. चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 199 रुपये द्यावे लागतील. रेंट दिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पुढील 30 दिवसांत कधीही पाहू शकता, परंतु एकदा पाहायला सुरु केल्यास तुम्हाला हा चित्रपट 48 तासात पूर्ण पाहावा लागेल. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

अभिषेक पाठकद्वारा दिग्दर्शित दृश्यम 2 यावर्षी 18 नोव्हेंबरला चित्रपटगुहांमध्ये रिलीज झाला होता. साधारणतः मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर चित्रपट चार किंवा आठ आठवडयांनी ओटीटीवर येतो. परंतु , दृश्यम 2 अनेक आठवडे चित्रपटगुहांमध्ये टिकला होता. यामुळे चित्रपट ओटीटीवर येण्यास थोडा वेळ गेला. आशा आहे की पुढील महिन्यात प्राइम सब्सक्राइबर्ससाठी हा चित्रपट रिलीज केला जाईल आणि अतिरिक्त रेंट द्यावं लागणार नाही.

इथे पाहा चित्रपटचा ट्रेलर

Drishyam 2 ची गोष्ट

साल 2015 मध्ये दृश्यमचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं, परंतु त्यांच्या निधानानंतर Drishyam 2 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक पाठक यांनी पार पाडली. हा अभिषेकचा डेब्यू चित्रपट आहे. जिथे दृश्यमची गोष्ट संपते तिथूनच दृश्यम 2 ची गोष्ट सुरु होते, तिचं पात्र आणि तोच परिसर यात दाखवण्यात आला आहे. हे देखील वाचा: वनप्लसची गादी धोक्यात? 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह धमाकेदार iQOO Neo 7 Racing Edition लाँच

Drishyam 2 स्टार कास्ट

चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांनी जुन्याच भूमिकेत दिसत आहेत. तर दुसऱ्या भागात अक्षय खन्नानं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. Drishyam 2 देखील इतर अनेक हिंदी चित्रपटांप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटाचा रीमेक आहे. विशेष म्हणजे या चित्रपटचा ओरिजनल मल्याळम व्हर्जन Drishyam 2 अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ वरच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here