9000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे शक्तिशाली फोन OnePlus 12 5G, सोबत मोफत मिळतील इअरबड्स

वनप्लस च्या नंबर सीरीजचा लवकरच विस्तार होणार आहे यामध्ये वनप्लस 13 स्मार्टफोन लाँच केला जाईल. त्याच्या येण्याआधी मागील मॉडेल वनप्लस 12 5G 9,000 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. विशेष बाब म्हणजे या फोनसोबत कंपनी 7,999 रुपये किमतीचे इयरबड्सही मोफत देत आहे. त्यामुळे जर तुम्ही एक फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला, सर्व ऑफर्स आणि मोबाईलचे स्पेसिफिकेशन सविस्तरपणे जाणून घेऊया.

OnePlus 12 5G ची ऑफर्स आणि किंमत (कंपनी वेबसाईट)

  • कंपनीच्या वेबसाईटवर वनप्लस 12 5G वर 2,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट आणि 7,000 रुपयांचा बँक डिस्काऊंट दिला जात आहे. यानंतर किंमत फक्त 55,999 रुपये होईल. ही ऑफर आयसीआयसीआय, वन कार्ड, कोटक बँक क्रेडिट कार्डवर मिळेल.
  • डिव्हाईस सोबत कंपनी OnePlus Buds Pro 2 देखील मोफत देत आहे. ज्याची किंमत 7,999 रुपये आहे.
    जर तुम्ही फोनला 3 ते 6 महिन्यांपर्यंतच्या सोप्या हप्त्यांवर खरेदी करत असेल तर नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय उपलब्ध आहे.
  • वनप्लस 12 5G चा 12 जीबी + 256 जीबी मॉडेल लाँचच्या वेळी 64,999 रुपये आणि 16 जीबी + 512 जीबी 69,999 रुपयांमध्ये आला होता.
  • फोनसाठी सिल्की ब्लॅक, फ्लॉई एमराल्ड आणि ग्लेशियल व्हाईट असे तीन रंग मिळत आहेत.

OnePlus 12 5G ची ऑफर्स आणि किंमत (ॲमेझॉन)

  • वनप्लस 12 स्मार्टफोनवर सध्या 2,000 रुपयांचा फ्लॅट कूपन डिस्काऊंट दिला जात आहे. यासोबत ग्राहकांना 6,000 रुपयांची बँक ऑफर मिळेल. ज्याच्या मदतीने एकूण 8,000 रुपयांची सूट मिळणार आहे.
  • कूपन आणि बँक डिस्काउंट लागू झाल्यानंतर डिव्हाईसची किंमत फक्त 56,998 रुपये होते.
  • या ऑफरसह डिव्हाईस खरेदी केल्यावर ब्रँडद्वारे OnePlus Buds Pro 2 मोफत दिले जाईल. ज्याची किंमत 7,999 रुपये आहे.
  • जर तुम्हाला संपूर्ण पेमेंट एकाच वेळी करायचे नसल्यास नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा डिव्हाईस खरेदी करता येईल.
  • कंपनी वनप्लस 12 5G स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचा जुना फोन विकायचा असेल तर 36,400 रुपयांपर्यंत सूट मिळेल. मात्र, जुन्या मोबाईलच्या स्थितीनुसार तो मिळेल.

OnePlus 12 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: OnePlus 12 5G मध्ये ग्राहकांना 6.82 इंचाचा क्वॉडएचडी+ 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलटीपीओ+ पॅनेल आहे. यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4500निट्स ब्राईटनेस मिळत आहे. तसेच, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 लावण्यात आले आहे.
  • प्रोसेसर: हा फोन अँड्राईड 14 आधारित ऑक्सिजन ओएस वर काम करत आहे. प्रोसेसिंगसाठी मोबाईलमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चिपसेट आहे. जो 3.3 गिगाहर्ट्स क्लॉक स्पीड देते. तर ॲड्रेनो 750 जीपीयू ग्राफिक्स आणि गेमिंगसाठी प्रगत व्हेपर कूलिंग सिस्टम मिळत आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: स्टोरेज आणि रॅमच्या बाबतीत OnePlus 12 5G डिव्हाईसमध्ये 16 जीबी पर्यंत पॉवर आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल मेमरी मिळत आहे.
  • कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये एफ/2.6 अपर्चर असलेली 64 मेगापिक्सेलची पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, एफ/1.6 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सेलची वाईड अँगल लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 48 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स बसवण्यात आली आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी OnePlus 12 मध्ये 5,400 एमएएच ची बॅटरी आहे. त्याला लवकर चार्ज करण्यासाठी यात 100 वॉट फास्ट चार्जिंग आणि 50 वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here