फक्त 8,190 रुपयांमध्ये लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी जे2 (2018), देईल का शाओमी ला टक्कर?

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपला नवीन मीड बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 डुओ लॉन्च केला होता ज्याची किंमत 16,990 रुपये ठेवण्यात आली होती. तर आज या दिग्गज कंपनी ने आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. सॅमसंग ने देशात गॅलेक्सी जे2 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो 8,190 रुपयांच्या किंमतीवर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे2 (2018) च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन मागच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या गॅलेक्सी जे2 चा अपग्रेड वर्जन आहे. या फोन मध्ये 960 x 540 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5-इंचाचा क्यूएचडी डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. फोन ची इंटरनल स्टोरेज 16जीबी आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी या फोन च्या बॅक पॅनल वर 8-मेगा​पिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येतात.

सॅमसंग गॅलेक्सी जे2 (2018) 4जी फोन आहे तसेच कंपनी ने याला सॅमसंग मॉल सह सादर केले आहे. बेसिक कने​क्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 2,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि पिंक कलर वेरिएंट मध्ये 8,190 रुपयांच्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here