17,500 रुपयांमध्ये वनप्लसचा दणकट फोन; OnePlus Nord CE 2 Lite वर मिळतोय कम्युनिटी सेल डिस्काउंट

अ‍ॅप्पल-सॅमसंगला प्रीमियम रेंजमध्ये टक्कर देणारी वनप्लस कंपनी मिडरेंजमध्ये रेडमी-रियलमी सारख्या कंपन्यांना देखील टक्कर देत आहे. आता कंपनीनं OnePlus Community Sale सुरु केला आहे, या सेलअंतर्गत कंपनी आपल्या सर्व स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काउंट देत आहे. म्हणून OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर दमदार डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या वनप्लस स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर, 64MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते. पुढे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट, ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वनप्लसच्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती देखील देत आहोत.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत आणि ऑफर

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 18,999 रुपयांची किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. वनप्लसच्या या फोनवर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट वनप्लस कॉम्युनिटी सेल अंतर्गत दिला जात आहे. त्यामुळे OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत फक्त 17,499 रुपये होईल. हे देखील वाचा: रेडमीच्या आधीच ‘ही’ कंपनी भारतात आणतेय 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेट घोषित

फेडरल बँकेच्या कार्डवर देखील 1,250 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच जर तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी किंमत कमी करू शकता. बँक डिस्काउंटसह हा फोन अ‍ॅमेझॉनवर EMI वर देखील विकत घेता येईल. ईएमआय ऑप्शन 908 रुपयांपासून सुरु होत आहेत.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स

Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59-इंच IPS LCD फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता या फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. OS पाहता हा फोन अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्स आधारित ऑक्सीजनओएस 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

Nord CE 2 Lite 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात f/1.7 अपर्चर असलेला 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स आणि 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here