OnePlus Ace 2 मध्ये मिळू शकतो 1.5K डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट

नुकताच OnePlus Nord N20 SE स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा मोबाइल फोन 14,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल जो 50MP Camera, 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. हा जरी मिडबजेट स्मार्टफोन असला तरी कंपनीनं फ्लॅगशिप सेगमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Ace 2 लवकरच लाँच करू शकते. इंटरनेटवर वनप्लस एस 2 चे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2

वनप्लस एस 2 ची माहिती टिपस्टर योगेश बरारनं शेयर केली आहे. या वनप्लस फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल 6.7 इंचाच्या 1.5के डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. लीकनुसार यात स्क्रीन पंच-होल स्टाईलसह मिळेल जी फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनलवर बालसा असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. सेल्फी कॅमेरा फोनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या पंच-होलमध्ये मिळू शकतो. हे देखील वाचा: 128GB मेमरी आणि 6GB रॅम असलेल्या रेडमी 5G फोनवर जबराट डिस्काउंट; दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

OnePlus Ace 2 स्मार्टफोन सर्वात नवीन ओएस अँड्रॉइड 13 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 चिपसेट दिली जाऊ शकते. लीकनुसार वनप्लस एस 2 स्मार्टफोन 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच या स्मार्टफोनचे 12 जीबी रॅम व 8 जीबी रॅम व्हेरिएंट्स देखील बाजारात लाँच केले जाऊ शकतात, असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OnePlus Ace 2 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: आयफोनलाही टक्कर देईल असा Xiaomi चा सर्वात शक्तिशाली फोन; उच्च दर्जाच्या प्रोसेसर आणि कॅमेरा

OnePlus Ace 2 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते जी वनप्लस एस 2 ची सर्वात मोठी खासियत असू शकते. OnePlus Ace 2 कधीपर्यंत लाँच होईल आणि याची प्राइस रेंज किती असेल या माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here