OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • हा फोन हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येतो.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो.
  • फोल्डेबल डिवाइस 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

OnePlus च्या फोल्डेबल डिवाइसच्या लाँच डेट बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार डिवाइसची एंट्री येत्या 29 ऑगस्टला होऊ शकते. हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल जो हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो. फोनच्या लाँचची लीक माहिती तसेच डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

कधी येणार वनप्लसचा फोल्डेबल फोन

  • वनप्लसच्या फोल्डेबल फोनच्या लाँच डेटबद्दल टेक वेबसाइट स्मार्टप्रिक्सनं खुलासा केला आहे.
  • रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा डिवाइस येत्या 29 ऑगस्टला अधिकृतपणे सादर केला जाईल.
  • OnePlus डिवाइसबद्दल अचूक टिप्स देणाऱ्या टिपस्टर Max Jambor नं देखील कंफर्म केलं आहे की हा फोन 29 ऑगस्टला लाँच होईल.
  • असं देखील सांगण्यात आलं आहे की नवीन फोल्ड फोन न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल.
  • हा डिवाइस वनप्लस ओपन नावानं येईल की इतर कोणत्या नावानं, हे मात्र निश्चित झालं नाही.

वनप्लस फोल्डेबल फोन स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : वनप्लसच्या नवीन फोल्डेबल डिवाइसमध्ये 7.8 इंचाचा मोठा AMOLED फोल्डेबल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच 6.3 इंचाचा छोटा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. ह्यात देखील 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : दमदार परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू मिळेल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : फोनचा कॅमेरा पाहता ह्यात बॅक आणि डिस्प्लेवर एकूण पाच कॅमेरे मिळू शकतात. ह्यात रियर पॅनलवर 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 48MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64MP ची टेलीफोटो लेन्स मिळू शकते. तसेच कव्हर डिस्प्लेवर 32MP चा फ्रंट कॅमेरा आणि आतील बाजूस 20MP चा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • ओएस : नवीन मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.1 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here