स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री

Highlights

  • OnePlus Pad कंपनीचा पहिला टॅबलेट डिवायस आहे.
  • हा टॅब 5G Cellular Data Sharing टेक्नॉलॉजीसह येतो.
  • वनप्लस पॅड फुल चार्ज झाल्यानंतर 1 महिन्यांचा स्टॅन्ड बाय देऊ शकतो.

वनप्लसनं नवी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन सोबतच अनेक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्ट प्रोडक्ट्स पैकी OnePlus Pad नं संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. वनप्लसनं पहिल्यांदाच एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. शानदार डिजाईन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर वनप्लस पॅडण थेट Apple iPad आणि Samsung Galaxy Tab ला आव्हान दिलं आहे. कंपनी आपला पहिला टॅबलेट डिवायस एप्रिलमध्ये सेलसाठी उपलब्ध करेल.

OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन्स

  • 144Hz Display
  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000
  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

वनप्लस पॅडची डिजाईन थोडी हटके आहे. कंपनीनं आपला हा टॅबलेट डिवायस चौकोनी आकारात सादर केला आहे. साधारणतः टॅबलेट डिवायस आयताकृती असतात, वनप्लस पॅडच्या चारही बाजू जवळपास एका आकाराच्या आहेत. हा टॅबलेट 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह आला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; अ‍ॅप्पल-सॅमसंगला टाकणार का मागे?

OnePlus Pad 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या डिस्प्लेसह एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

वनप्लस पॅड स्टाईलिश असण्यासोबतच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच, शाओमीची लागणार का वाट?

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad को 9,510एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here