OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही फोन्सचे अनेक लीक समोर आले आहेत. आता टिपस्टर मुकुल शर्मानं लाँचपूर्वीच वनप्लस नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 दोन्हीचे फुल स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत.
वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड 3 5जी मध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात सेल्फीसाठी पंच होल डिजाइनसह 120Hz रिफ्रेश रेट आहे.
- प्रोसेसर: वनप्लस फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरसह येऊ शकतो.
- रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज असू शकते.
- ओएस: OnePlus Nord 3 5G Android 13 आधारित OxygenOS 13.1 सह येऊ शकतो.
- कॅमेरा: रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा होने की उम्मीद आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर असेल. सेल्फीसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
- बॅटरी: फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
- इतर फीचर: वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ड्युअल स्पिकर, डॉल्बी एटमॉस, एक्स-अॅक्सिस मोटर एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि अलर्ट स्लाइडरचा समावेश केला जाऊ शकतो.
वनप्लस नॉर्ड सीई 3 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंचाचा फ्लूइड AMOLED डिस्प्ले असू शकतो. जो 950 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.
- प्रोसेसर: हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो.
- रॅम आणि स्टोरेज: फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम (16GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम) सह लाँच होण्याची शक्यता आहे.
- ओएस: वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी ऑक्सीजनओएस 13.1 सह येऊ शकतो. असं देखील सांगण्यात आलं आहे की हा दोन वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेटसह येईल.
- कॅमेरा: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे, ज्यात 50MP IMX890 प्रायमरी कॅमेरा (OIS), 8MP 112-डिग्री UW आणि 2MP 4cm मॅक्रो लेन्स असेल.
- बॅटरी: फोन 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
- अन्य फीचर: वनप्लस नॉर्ड 3 प्रमाणे नॉर्ड सीई 3 देखील ड्युअल स्पिकर, हायपरटच, हायपरबूस्ट, डॉल्बी एटमॉस, एक्स-अॅक्सिस मोटर एनएफसी आणि आयआर ब्लास्टर असण्याची शक्यता आहे.