OnePlus Nord N30 SE 5G फोनची किंमत आली समोर, या देशात होऊ शकतो सादर

Highlights

  • OnePlus Nord N30 SE 5G युरोपमध्ये सादर होऊ शकतो.
  • हा मोबाइल याआधी UAE मध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रिअर प्रायमरी कॅमेरा आहे.


वनप्लसने Nord N30 SE 5G ला जानेवारी महिन्यामध्ये UAE मध्ये सादर केले होते. तसेच, आता अपेक्षा आहे की हा डिव्हाइस जागतिक स्तरावर युरोपमध्ये लाँच केले जाऊ शकते. तसेच हे येण्याच्या अगोदर मोबाईलच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. ज्यामुळे असे वाटत आहे की ब्रँड OnePlus Nord N30 SE 5G लवकर या देशात एंट्री घेऊ शकतो. चला, पुढे फोनची लीक किंमत आणि याचे स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus Nord N30 SE 5G युरोप किंमत (लीक)

  • Appuals च्या रिपोर्टमध्ये युरोपीय बाजारात लाँच होण्याच्या अगोदर OnePlus Nord N30 SE स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे.
  • लीकनुसार नवीन वनप्लस स्मार्टफोन सिंगल स्टोरेज ऑप्शन 4GB रॅम + 128GB स्टोरेज मध्ये येऊ शकतो.
  • स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत EUR 229 म्हणजे जवळपास 20,500 रुपये असू शकते.
  • तुम्हाला सांगतो की वनप्लसने यूएईमध्ये फोनला AED 599 म्हणजे जवळपास 13,500 रुपयांमध्ये सादर केले होता.

OnePlus Nord N30 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: OnePlus Nord N30 SE 5G मध्ये 6.72 इंचाचा एफएचडी + एलसीडी डिस्प्ले आहे. ज्यावर 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. डिवाइसच्या स्क्रीनमध्ये पंच होल डिजाइन आहे.
  • प्रोसेसर: डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6020 चिपसेटचा उपयोग करण्यात आला आहे त्याचबरोबर जबरदस्त ग्राफिक्ससाठी माली जी57 MC2 जीपीयू मिळतो.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी OnePlus Nord N30 SE 5G मध्ये युजर्सना 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता OnePlus Nord N30 SE 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लावण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत OnePlus Nord N30 SE 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि 33वॉट सुपरवूक चार्जिंग देण्यात आली आहे.
  • अन्य: हा फोन ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारख्या ऑप्शनला सपोर्ट करतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा डिव्हाइस अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.1 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here