28 फेब्रुवारीला थायलंडमध्ये लाँच होईल Vivo V30 सीरीज, जाणून घ्या कोणत्या फिचर्ससह येणार नवीन फोन

Vivo V30 सीरीज बद्दल आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. भारतात ही सीरिज पुढच्या महिन्यात सादर केली जाईल. तसेच, आता कंपनीनं या सीरीजमध्ये येणाऱ्या Vivo V30 आणि Vivo V30 Pro ची लाँचच्या डेटची घोषणा केली आहे. तसेच विवोनं पुष्टी केली आहे की फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व्ड डिस्प्ले असेल, तर हँडसेटच्या सर्व तीन कॅमेरा Zeiss लेन्ससह येणार आहेत. कंपनीनं असा देखील खुलासा केला आहे की हँडसेट 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल.

Vivo V30 सीरीज लाँच डेट

दरअसल, कंपनीच्या वेबसाइटवर बनवण्यात आलेल्या लँडिंग पेजच्या नुसार, विवो वी30 आणि विवो वी30 प्रो 28 फेब्रुवारीला थायलंडमध्ये लाँच केला जाईल. देशात ग्राहक आता अर्ली बर्ड प्रोग्राम स्वरूपात हँडसेट प्रीऑर्डर करू शकतात. साइटवरून असे देखील समजले आहे की फोन तीन कलर ऑप्शन- ग्रीन सी, नाइट स्काय ब्लॅक आणि पर्ल व्हाइट मध्ये लाँच केला जाणार आहे.

कंपनीने ऑफिशियल केले आहेत स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने लँडिंग पेजवर हँडसेटच्या काही स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. या सीरीजचे फोन 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह येतील आणि तिन्ही कॅमऱ्यामध्ये Zeiss लेन्स असणार आहे. कॅमेरा मॉड्यूलच्या खाली एक ‘ऑरा’ लाइट आहे. कंपनीनुसार यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला 3D कर्व्ड डिस्प्ले असेल.

Vivo V30 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Vivo V30 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाची AMOLED स्क्रीन आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गमट आणि 2800 निट्स पर्यंत पीक ब्राइट्नेस देण्यात आली आहे.
  • चिपसेट: हा मोबाइल क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेटवर चालतो.
  • स्टोरेज: डिव्हाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
  • कॅमेरा: यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ऑप्टिकल फोटो स्टेबिलाइजेशन टेक्नॉलॉजीसह 50MP ओमनीव्हिजन OV50E सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आणि एक पोर्ट्रेट सेन्सर लावण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ऑटोफोकससोबत 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी: Vivo V30 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • ओएस: Vivo V30 स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच OS 14 वर चालतो.

Vivo V30 Pro स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: विवो V30 प्रो 6.78-इंच AMOLED स्क्रीनसोबत 2,800-निट पीक ब्राइटनेस, 2800×1260p रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.
  • कॅमेरा: रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य + 50MP अल्ट्रावाइड + 50MP पोर्ट्रेट टेलीफोटो कॅमेरा असू शकतो, जो ZEISS द्वारे सपोर्टेड असणार आहे.
  • प्रोसेसर: हा मीडियाटेक डाइमेंसिटी 8200 SoC द्वारे सपोर्टेड असू शकतो.
  • मेमरी : हा 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज मध्ये उपलब्ध होऊ शकतो.
  • बॅटरी: आणि 80W चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
  • सॉफ्टवेयर: डिवाइसला अँड्रॉइड 14-आधारित फनटचओएस 14 सह शिप केला जाऊ शकतो.
  • कनेक्टिव्हिटी: डिवाइस एनएफसीला स्पोर्ट करू शकतो.
  • अन्य: हँडसेटचे वजन 188 ग्रॅम आहे आणि याचे डायमेंशन 164.4mmx 75.1mmx 7.5mm असू शकते. तसेच फोनमध्ये तुम्हाला IP54 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here