ओप्पोनं आणखी एक स्वस्त 5जी फोन OPPO A1x; 8GB RAM सह मिळतंय खूप काही

Highlights

  • OPPO A1x 5G चायनामध्ये लाॅन्च झाला आहे.
  • हा MediaTek Dimensity 700 वर चालतो.
  • या ओप्पो फोनमध्ये 8जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट करतो.

ओप्पोनं आज आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन मोबाइल फोन OPPO A1x 5G लाॅन्च केला आहे. हा एक मिडबजेट 5जी फोन आहे जो 8GB RAM, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह येतो. हा फोन सध्या भारतात येण्याची शक्यता कमी आहे परंतु स्टायलिश लुक आणि शानदार फीचर्सच्या जीवावर हा टेक विश्वात चर्चेत नक्की राहू शकतो. पुढे तुम्ही ओप्पो ए1एक्स 5जीची संपूर्ण माहिती वाचू शकता.

ओप्पो ए1एक्सचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ 90Hz display
  • 8GB RAM + 128GB ROM
  • MediaTek Dimensity 700
  • 13MP + 2MP Rear camera
  • 8MP Selfie camera
  • 10W 5,000mAh Battery

OPPO A1x 5G फोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाॅन्च झाला आहे. हा फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. हा फोन स्क्रीन 600निट्स ब्राइटनेस आणि 100% आरजीबी कलर गामुटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा

ओप्पो ए1एक्स फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A1x 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12 वर लाॅन्च झाला आहे ज्यात LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage मिळते. फोनमध्ये 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: 31 मार्चला लाँच होईल Infinix Hot 30 स्मार्टफोन; सर्वप्रथम थायलँडमध्ये होणार एंट्री

ओप्पो ए1एक्सची किंमत

OPPO A1x 5G चीनमध्ये दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत 1399 युआन आणि 1599 युआन आहे जी भारतीय कंरसीनुसार 16,700 रुपये आणि 19,000 रुपयांच्या आसपास आहे. चायनामध्ये हा फोन Quite Sea Blue आणि Starry Sky Black कलरमध्ये एंट्री आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here