या वर्षी जुलै मध्ये चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी ओपो ने ए3 एस मॉडेल सादर केला होता. त्यावेळी हा सर्वात कमी किंमतीचा नॉच डिस्प्ले असलेला फोन होता. जरी त्यानंतर काही फोन लॉन्च झाले असले तरी नॉच डिस्प्ले सोबत मोठी बॅटरी असल्यामुळे याचे कौतुक झाले. भारतीय बाजारात ओपो ए3एस 2जीबी आणि 3जीबी रॅम सोबत दोन वेरियंट मध्ये आला आहे. गेल्या महिन्यात कंपनी ने 2जीबी रॅम मॉडेलची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती. तर आज पुन्हा एकदा याची किंमत कमी केली आहे. भारतीय बाजारात ओपो ए3एस 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
तर गेल्याच आठवड्यात कंपनी ने 3जीबी मॉडेलची किंमत पण कमी केली होती. भारतीय बाजारात ओपो ए3एस च्या 3जीबी रॅम मॉडेलची किंमत 13,990 रुपये होती पण आता हा फोन 12,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.ओपो ए3एस मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल तर 2जीबी रॅम असलेला मॉडेल 16जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरियंट सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि 128जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येतो.
ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.















