स्वस्तात फर्स्ट क्लास फोन! OPPO A57e भारतात लाँच, पाहा याची प्राइस आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन्स

oppo a57s price in india launched with 4gb ram 13mp camera 5000mah battery Mediatek Helio G35 Processor

OPPO A57e Launch: ओप्पोनं काही दिवसांपूर्वी आपल्या ए सीरिजमध्ये OPPO A57s स्मार्टफोन युरोपियन बाजारात सादर केला होता. हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. परंतु आता त्यापेक्षा स्वस्त स्मार्टफोन कंपनीनं आज भारतीय बाजारात सादर केला आहे. Oppo नं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन OPPO A57e लाँच केला आहे. ओप्पो ए57ई एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. या नवीन ओप्पो मोबाइलमध्ये 4GB RAM, Mediatek Helio G35 Processor, 13MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात.

OPPO A57e चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए57ई 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह भारतीय ग्राहकांच्या भेटीला आहे. या फोनची स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते तसेच 600निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो रेश्यो 89.8 टक्के आहे तसेच याचे डायमेंशन 75.03×163.74×7.99एमएम आणि वजन 187ग्राम आहे. हे देखील वाचा: ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s

oppo a57s price in india launched with 4gb ram 13mp camera 5000mah battery Mediatek Helio G35 Processor

फोटोग्राफीसाठी OPPO Mobile ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A57e स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित कंपनीच्या कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

oppo a57s price in india launched with 4gb ram 13mp camera 5000mah battery Mediatek Helio G35 Processor

OPPO A57e ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. या डिवायसमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा

oppo a57s price in india launched with 4gb ram 13mp camera 5000mah battery Mediatek Helio G35 Processor

OPPO A57e ची किंमत

ओप्पो ए57ई मोबाइल फोन अधिकृतपणे लाँच केल्यानंतर लगेचच हा फोन कंपनीनं शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध केला आहे. OPPO A57e ची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ओप्पो ए57ई Green आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here