वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स

ओपो ने या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या स्मार्टफोन्सची ‘ए सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस ए7एक्स सादर केला होता. वॉटरड्रॉप डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. आता या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची बातमी समोर आली आहे. ताज्या लीक मधून ओपो ए7 स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे ज्यात फोनच्या आॅफिशियल घोषणेच्या आधी त्याचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीक नुसार ए सीरीज मधील आधीच्या फोन प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वॉल 6.2-इंचाचा एचडी+​ डिस्प्ले मिळेल जो 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 सह सादर केला जाईल ताईच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल.

ओपो ए7 बद्दल आलेल्या या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी आपला आगामी फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर करू शकते ज्यात 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम असेल. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतील जी माइक्रोएसडी कार्ड नवे वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहत लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील . तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

ओपो ए7 स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करेल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी असेल. तसेच लीक मध्ये फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर प्रश्नचिन्ह आहे. जरी कंपनी ने ओपो ए7 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नसली तरी बोलले जात आहे कि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा फोन जगासमोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here