48MP रियर कॅमेरा आणि 5G च्या पावरसह OPPO A74 झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

OPPO ने भारतीय मार्केटमध्ये आपला नवीन फोन OPPO F19 को लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो प्लस लॉन्च केले आहेत. तसेच कंपनीने आपल्या A-सीरीजमध्ये नवीन फोन OPPO A74 4G आणि OPPO A74 5G स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन सध्या Philippines च्या टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. अनेक दिवस या फोनबद्दल लीक आणि माहिती समोर येत होती, ज्यांच्यावर आज पूर्णपणे विराम लावला आहे. पुढे तुम्हाला OPPO A74 च्या 4G आणि 5G फोनबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (oppo a74 4g 5g launch price specification)

डिजाइन

OPPO 4G आणि 5G च्या डिजाइन बद्दल बोलायचे तर हे दोन्ही फोन एकसारखे आहेत. पण, या वेरिएंटच्या फीचर्समध्ये थोडा फरक आहे, ज्याची माहिती तुम्हाला पुढे देण्यात आली आहे. या दोन्ही फोनचा फ्रंट लुक पाहत यात फ्रंटला टॉप लेफ्ट कॉर्नरवर होल-पंच देण्यात आला आहे. या पंच-होलमुळे फोनच्या फ्रंटला तिन्ही बाजूंनी नगण्य बेजल आहेत. तसेच बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. 4G च्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा आहे. दुसरीकडे 5G फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

OPPO A54 4G चे स्पेसिफिकेशन्स

OPPO A74 4G मध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो FHD+ रिज्योलूशनसह येतो. तसेच, स्क्रीनमध्ये स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज सपोर्ट आहे. डिवाइस Qualcomm’s Snapdragon 662 चिपसेट पावरसह येतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 610 GPU आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ

फोटोग्राफी पाहता यात ट्रिपल रियर-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP की डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा यूनिट आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी A74 4G मध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 4 जी, वाय-फाय 802.11 बी / जी / एन / एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट आहे. तसेच ओपो ए74 4G काहीसा OPPO F19 सारखा आहे. ओपो A74 Prism Black आणि Midnight Blue कलरमध्ये आला आहे.

OPPO A74 5G चे स्पेसिफिकेशन्स

ओपो A74 5G मॉडेल वेगवेगळ्या हार्डवेयरसह येतो, यात मागे एक अतिरिक्त 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे आणि यात 4G वेरिएंटच्या तुलनेत 90Hz रिफ्रेश रेट आहे. A74 5G मध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिवाइसमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाजूला आहे. तसेच फोन स्नॅपड्रॅगॉन 480 5G SoC सह येतो जो 6GB रॅम आणि 128GB च्या इंटरनल स्टोरेजसह आला आहे. A74 4G प्रमाणे, 5G मॉडेल पण आउट ऑफ द बॉक्स 11 अँड्रॉइडवर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ व माइक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा आहे. डिवाइसमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. A74 5G कंपनीने Fluid Black आणि Space Silver कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा : Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च

OPPO A74 4G आणि 5G ची किंमत

OPPO A74 4G आता Philippines स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फोन OPPO Cambodia ऑफिशियल साइटवर लिस्ट झाला आहे. किंमत पाहता ओपो ए74 ची किंमत PHP 12,000 (जवळपास 18,174 रुपये) आहे. ओपो ए74 5जी बद्दल बोलायचे तर हा कंपनीने जवळपास 21,000 रुपयांमध्ये सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here