OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी

OPPO ने अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन ऑपरेटिंग सिस्टम Color OS 7 लॉन्च केली आहे. अनेक आर्कषक फीचर्स असलेला हा ओएस देशात जवळपास 25 स्मार्टफोन्स वर येईल आणि नवीन लॉन्च होणाऱ्या OPPO स्मार्टफोन्स मध्ये आधीच असेल. आता आपल्या फॅन्स व यूजर्स साठी या चीनी ब्रँडने OPPO Care स्कीमची घोषणा केली आहे. या खास स्कीम मध्ये कंपनी OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजचे हिट स्मार्टफोन्स डिस्काउंट सह विकेल तसेच OPPO आपल्या यूजर्सना शून्य व्याजदर आणि झिरो डाउन पेमेंट सह फोन विकत घेण्याचा संधी देत आहे.

OPPO Care मध्ये स्वस्त मिळणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी OPPO Reno 2Z की बद्दल बोलायचे तर या डिवाईस इंडियन मध्ये 29,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. काही दिवसांपूर्वी OPPO ने Reno 2Z ची किंमत 2,000 रुपये कमी केली होती, ज्या नंतर फोनची किंमत 27,990 रुपये झाली होती. आता स्कीम अंतर्गत पुन्हा या स्मार्टफोनच्या किंमतीत थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. नवीन प्राइज कट नंतर OPPO Reno 2Z फक्त 25,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Oppo Reno 2F पाहता कंपनीने या शानदार डिवाईसची किंमत पण 2,000 रुपयांनी कमी केली आहे. Oppo Reno 2F इंडियन मार्केट मध्ये 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. आता ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे OPPO A सीरीजच्या Oppo A5 2020 आणि Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या किंमती पण कंपनीने कमी केल्या आहेत.

Oppo A5 2020 पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता, ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीचा समावेश होता. कंपनीने फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यानंतर हा 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A9 2020 च्या 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कंपनीने 1,500 रुपये कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता प्राइज कट नंतर OPPO A9 2020 चा 8 जीबी रॅम वेरिएंट 18,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO Care अंतर्गत ‘Triple Zero Scheme’ मध्ये कंपनी हे स्मार्टफोन्स झिरो प्रोसेसिंग फीस, झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इंटरेस्ट सह विकत घेण्याची संधी देत आहे. या स्कीमचा लाभ 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here