भारतात आली नवीन मोबाईल कंपनी, लॉन्च केले 2 स्वस्त सेल्फी सेंट्रिंक स्मार्टफोन

इंडियन स्मार्टफोन मार्केट आज संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारा मार्केट बनला आहे. देशातील स्मार्टफोन यूजर्स च्या वाढत्या संख्येचा फायदा करून घेण्यासाठी विदेशी कंपन्या पण भारतात आपले भविष्य शोधत आहेत. मागच्या वर्षी अनेक विदेशी कंपन्या भारतात येऊन चांगली फॅन फॉलाइंग पण बनवली आहे. यात आता अजून एका कंपनीची भर पडली आहे. वियतनाम ची प्रसिद्ध मोबाइल कंपनी मोबिस्टार ने भारतात पाऊल ठेवत आज एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने देशात आपली सुरवात सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन सह केली आहे आणि ‘एक्सक्यू डुअल’ आणि ‘सीक्यू’ नावाचे दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत.

मोबिस्टार एक्सक्यू डुअल
मोबिस्टार ने लॉन्च केलेल्या या फोन मध्ये 5.5-इंचाचा फुलएचडी डिसप्ले दिला आहे. हा फोन एंडरॉयड नुगट आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. या फोन ची इंटरनल स्टोरेज 32जीबी ची आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये 2 सिम कार्ड सह 1 माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येईल.

फोन मधील डुअल सेल्फी कॅमेरा या फोन ची मुख्य यूएसपी आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोबिस्टार सीक्यू
कंपनी ने हा फोन 5-इंचाच्या एचडी डिसप्ले सह सादर केला आहे जो 2.75डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन पण एंडरॉयड नुगट आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. हा फोन 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन पण एक्सक्यू डुअल प्रमाणे वोएलटीई सह वीएलटीई ला पण सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोबिस्टार ने आपल्या दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये सादर केले आहेत. एक्सक्यू डुअल 7,999 रुपयांचा किंमतीत आणला आहे तर सीक्यू 4,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. हे दोन्ही ​स्मार्टफोंस 30 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येतील. तर जियो कस्टमर्सना आॅफर अंतर्गत 2,200 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here