5 मार्चला लॉन्च होईल 48-एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो

ओपो बद्दल आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनी ने आपल्या एफ सीरीजच्या सर्वात नवीन आणि हिट स्मार्टफोन एफ9 प्रो ची किंमत कमी केली आहे. या प्राइज कटचा ओपो एफ11 प्रो च्या लॉन्च शी संबंध जोडला जात होता. आता ओपो इंडिया ने एफ11 प्रो ची लॉन्च डेट सांगत घोषणा केली आहे कि कंपनीच्या एफ सीरीजा चा हा आगामी स्मार्टफोन येत्या 5 मार्चला भारतीय टेक बाजारात येईल.

ओपो इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत एफ11 प्रो ची लॉन्च डेट सांगितली आहे. ओपो ने सांगितले आहे कि कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 5 तारखेला मुंबईत एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून ओपो एफ11 प्रो भारतीय बाजारात येईल. लॉन्च तारखेव्यतिरिक्त ओपो ने आतापर्यंत फक्त इतकेच सांगितले आहे कि एफ11 प्रो 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स
ओपो ने अजूनतरी एफ11 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार एफ11 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दोन कॅमेरा सेंसर दिले जातील ज्यात 48-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ओपो एफ11 प्रो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

एक्सक्लूसिव: वीवो वाय91आय असेल वॉटरड्रॉप नॉच असलेला सर्वात स्वस्त फोन, मार्च मध्ये होईल लॉन्च

ओपो एफ11 प्रो बद्दल मिळालेल्या माहितीनुसार ओपो आपला हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. ओपोचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेक च्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल. 5 मार्चला लॉन्च झाल्यांनतर ओपो एफ11 प्रो कधी सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोनची किंमत काय असेल यासाठी फोन लॉन्चची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here