OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर

OPPO ने अलीकडेच भारतात आपल्या ‘एफ19’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते जे OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नावाने बाजारात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ नंतर आता माहिती समोर येत आहे कि कंपनी सीरीजचा अजून एक नवीन मॉडेल बाजारात घेऊन येण्याची तयारी करत आहे आणि हा फोन OPPO F19 नावाने मार्केटमध्ये लॉन्च होईल.

OPPO F19 ची माहिती लीकच्या माध्यमातून आली नसून स्वतः ओपने एफ19 स्मार्टफोनच्या लॉन्चचा खुलासा केला आहे. हा फोन भारतात नव्हे तर शेजारच्या श्रीलंकेत येईल. ओपो श्रीलंकाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करून ‘कमिंग सून’ लिहिले आहे. कंपनीने फोनची लॉन्च डेट किंवा प्राइस रेंजची कोणतीही माहिती दिली नाही कि पण या ट्वीटमध्ये फोनच्या रियर पॅनलचा फोटो दाखवून डिजाईनचा खुलासा केला आहे.

OPPO F19

ओपो एफ19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळी आहे. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर OPPO F19 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. तिन्ही कॅमेरा सेंसर एका बाजूला वर्टिकली आहेत. तर दुसऱ्या बाजूला सेंसर डिटेल सोबतच एलईडी लाईट आहे. फोटोवरून समजले आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

लीक्स पाहता OPPO F19 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पण सीरीजच्या इतर डिवायसेज प्रमाणे स्लिम असेल आणि याची जाडी 7-8एमएमच्या आसपास असेल. ओपो एफ19 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. लीकनुसार भारतात या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनच्या लॉन्च डेटची माहिती अजूनतरी समोर आली नाही.

हे देखील वाचा : ओपोने आणला लो बजेट OPPO A54, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

OPPO F19 Pro

ओपो एफ19 प्रो कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे ज्यातील बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.

OPPO F19 Pro Plus 5G

ओपो एफ19 प्रो प्लस या सीरीजचा सर्वात मोठा आणि पावरफुल डिवायस आहे जो 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह लॉन्च झाला आहे. हा फोन एकाच वेरिएंटसह बाजारात आला आहे पण हा फोन एफ19 प्रो प्रमाणे 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन भारतात 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here