भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

Highlights

 • OPPO F23 कंपनीच्या जुन्या OPPO F21 सीरिजची जागा घेईल.
 • OPPO F23 5G हा मिडरेंज स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
 • आगामी ओप्पो फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 सीरिजचा चिपसेट मिळू शकतो.

OPPO F23 5G हा मिडरेंज स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे, हा फोन कंपनीच्या OPPO F21 5G ची जागा घेईल. आगामी एफ सीरिज लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता टिपस्टर मुकुल शर्मानं या डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, रेंडर्स आणि किंमतही लीक केली आहे. मुकुलनं ट्विटरवरून F23 5G ची जवळपास सर्वच माहिती लीक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार OPPO F23 5G ची किंमत 30 हजारांच्या आत ठेवली जाऊ शकते. फोनमध्ये Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर यात फास्ट चार्जिंग, 256जीबी पर्यंत स्टोरेज, 120Hz डिस्प्ले आणि मायक्रोलेन्स कॅमेरा असे फीचर्सही मिळू शकतात. टिपस्टर ईशान अग्रवालनं फोनचे फोटो देखील शेयर केले आहेत.

ओप्पो एफ23 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • 6.72” FHD+ Display
 • 120Hz Refresh Rate

OPPO F23 5G मध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याचबरोबर अशी माहिती आली आहे की कंपनी यात अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करू शकते. हा डिवाइस बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक आशा दोन कलर ऑप्शन्समध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन

 • Snapdragon 695 5G SoC
 • 8GB RAM, 256GB storage

या डिवाइसमध्ये Snapdragon 695 5G चिपसेट दिला जाऊ शकतो, टिपस्टरनुसार या फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिली जाऊ शकतो. फोनचे अजून व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो. इनबिल्ट रॅमसह 5GB वर्चुअल रॅमचा ऑप्शन देखील कंपनी देऊ शकते.

 • 64MP Triple Rear Camera
 • 32MP selfie camera

या ओप्पो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 2MP ची मोनोक्रोम लेन्स, आणि 2MP ची मायक्रोलेन्स जी 40x क्षमतेसह मिळू शकते. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

 • 5,000mAh battery
 • 67W fast charging

पावर बॅकअपसाठी ओप्पो एफ23 5जी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 67वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन 8.2एमएम जाड, 192 ग्राम वजन, अँड्रॉइड 13 ओएस, ड्युअल सिम आणि 3.5एमएम हेडफोन जॅकसह येऊ शकते. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

ओप्पो एफ23 5जी ची किंमत (लीक)

या डिवाइसची बॉक्सवर किंमत 28,999 रुपये असू शकते आणि आमच्या अपेक्षेनुसार फोन यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here