Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi चा फ्लॅगशिप फोन Redmi K70 Ultra गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे स्पेक्स आणि लाँच तपशील अनेक वेळा लीक झाले आहेत. त्याचवेळी आता ब्रँडने शेवटी पुष्टी केली आहे की, या महिन्यात हा मोबाईल शक्तिशाली स्पेसिफिकेशनसह लाँच केला जाईल. त्याला चीनच्या देशांतर्गत मार्केटमध्ये एन्ट्री मिळणार आहे. चला, पुढे नवीन टीझरमध्ये समोर आलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Redmi K70 Ultra लाँच आणि मुख्य तपशील (पुष्टी)
- आपण खाली दिलेल्या टीझरमध्ये पाहू शकता की, ब्रँडने जुलैमध्ये Redmi K70 Ultra लाँच करण्याची घोषणा केली आहे.
- टिझर पोस्टरनुसार स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर चार कॅमेरा सेन्सर असतील. तर डिव्हाईसच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे पाहायला मिळत आहेत.
- प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर मिळण्याची पुष्टी झाली आहे.
- Dimensity 9300+ चिपसेटचा AnTuTu स्कोअर 2,382,780 आहे. याचा अर्थ वापरकर्त्यांना फ्लॅगशिप लेव्हलचा अनुभव मिळेल याची खात्री आहे.
- डिव्हाईसमध्ये 1.5k स्क्रीन रिझोल्यूशन आणि 120fps उच्च फ्रेम असलेला डिस्प्ले असेल.
- Redmi K70 Ultra स्मार्टफोनमध्ये 3D आईस कूलिंग तंत्रज्ञान असेल जे चिपसेटच्या कोर तापमानाला 3 अंश सेल्सिअसने कमी करण्याची क्षमता प्रदान करेल.
- ब्रँडने यापूर्वी देखील पुष्टी केली होती की, हा डिव्हाईस पाणी आणि धूळ यांच्या प्रतिरोधासाठी IP68 रेटिंगसह येईल.
Redmi K70 Ultra स्पेसिफिकेशन (अपेक्षित)
- डिस्प्ले: रिपोर्ट्समध्ये असे दिसून आले आहे की Redmi K70 Ultra मध्ये 8T OLED पॅनल मिल बसविण्यात येऊ शकते. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच यात सुरक्षेसाठी इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.
- ग्राफिक्स चिप: फोनमध्ये डेडिकेटेड X7 ग्राफिक्स चिपचा उपयोग केला जाऊ शकतो.
- स्टोरेज आणि रॅम: लीकनुसार हा नवीन फोन 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज, 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 1 टीबी अशा चार स्टोरेज पर्यायांमध्ये येऊ शकतो.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाईसमध्ये 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा मिळू शकतो.
- बॅटरी: मोबाईलमध्ये 120W फास्ट चार्जिंग आणि 5,500mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.














